साईबाबा सुपरस्पेशालिटीमध्ये १९ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया; राज्यशासनाने दिले सहा वर्षांत १२९ कोटी


शिर्डी प्रतिनिधी 

शहरातील साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये १९ हजार ४७७ रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व नतंर महात्मा जोतिबा फुले या नावाने सुरु असलेल्या जीवनदायी योजनाच्या माध्यमातून ह्रदयरोग शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, डायलेसीस आदींसह जवळपास ९७२ आजारांसाठी राज्य सरकार आणि नॅशनल इंशुरस कंपनीच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेच्या खर्चापोटी साईबाबा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटला सहा वर्षांच्या कालावधीत १२९ कोटी ९५ लाख १३ हजार ७७३ रुपये बिलापोटी शासनाकडून मिळाले आहेत. 

या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना १० ते १५ तज्ञ डाॅक्टरांचे पथक मार्गदर्शन करीत आहे. कागदपत्राची पूर्तता, आजार निदान, तपासणी आणि त्यानतंर जो आजार असेल आणि तो या योजनेत बसत असेल तर तात्काळ शस्त्रक्रिया केली जाते. त्याबरोबरच वर्षभर मोफत औषधे दिली जातात. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल. आणि सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाना चांगली सेवा देण्यासाठी हाॅस्पिटलचा प्रयत्न असतो, अशी माहिती वैद्यकीय संचालक डाॅ. विजय नरोडे, वैद्यकीय प्रशासक डाॅ. प्रितम वडगावे यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget