Breaking News

नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआरवर नोंद घेणे बंद


बीड, (प्रतिनिधी):- येथील नगरपालिकेने नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआर नोंद घेणे बंद केले आहे. शहरामध्ये ४० टक्के जमीन इमानी असुन गोर-गरीब लोक त्याठिकाणी पत्र्याचे शेड मारुन तर काही जण कच्ची घरे बांधुन राहतात. मात्र पीटीआरवर नोंद घेतली जात नसल्याने त्याचा फटका या सर्वसामान्यांना बसू लागला आहे. या प्रकरणी सय्यद मुजीब (एवन) यांनी काल मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. पुर्वीप्रमाणेच बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआरवर नोंद करुन घ्यावी अन्यथा उपोषण करण्याचा ईशारा त्यांनी दिला आहे. बीड शहरात ४० टक्के जमीन इनामी आहे. त्यावर कच्ची किंवा पत्र्याची घरे बांधुन अनेक गोरगरीब लोकं राहत आहेत. संबंधित नागरिकांची नावे बीड पालिकेच्या पीटीआर रजिस्ट्रवर नोंदवणे आवश्यक असुन पुर्वी नोटरी बॉंन्डच्या आधारे पीटीआर रजिस्ट्रवर भोगवटदारची नोंद घेतली जात होती. मात्र पालिकेने ती बंद केल्याने गोरगरीब सर्वसामान्यांच्या नोंदी होणे बंद झाले आहे. यामुळे नगरपालिकेचेही आर्थिक नुकसान होत असुन पालिकेने पुर्वीप्रमाणे नोटरी बॉंन्डच्या आधारे भोगवटदारची पीटीआर नोंद घ्यावी अशी मागणी सय्यद मुजीब यांनी केली आहे.