विकासाच्या नावाखाली सत्ताधार्‍यांकडून जनतेची घोर फसवणुक -विजयसिंह पंडित

गेवराई,(प्रतिनिधी)ः टाकळगव्हाण येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देऊनसुध्दा आजवर या गावात एकही काम सत्ताधार्‍यांकडून झाले नाही. शिवसेनेकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सत्ता असतानाही त्यांना या भागात कामे करता आली नाहीत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली सत्ताधार्‍यांकडून ग्रामीण जनतेची घोर फसवणुक होत असल्यामुळे युवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. टाकळगव्हाण येथे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

गेवराई तालुक्यातील मौजे टाकळगव्हाण (खडकी) येथील शिवप्रेमी प्रतिष्ठान या संघटनेच्या शेकडो तरुणांनी शुक्रवार, दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची गावात शाखा स्थापन करून विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, पांडूरंग कोळेकर, संभाजी पवळ, मदनराव घाडगे, राजेंद्र वारंगे, सुरेश लोंढे, जयसिंग जाधव, आनंद सुतार, संदीप मडके, विकास सानप, सोमेश्‍वर गचांडे, डॉ.रमाकांत कुंभार, किशोर पारख, वचिष्ट काळे, विक्रम कदम, विष्णू काचोळे, बालाजी उघडे, साहेल शेख, प्रल्हाद करांडे, पुरुषोत्तम लोंढे, अनिरुद्र मुळे, विजयसिंह करपे, मधुकर पवळ, तुकाराम पवळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विजयसिंह पंडित यांनी तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील टाकळगव्हाण सारख्या अनेक गावात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विद्यमान आमदारांना मताधिक्य दिले. मात्र निवडणुकीनंतर आमदारांनी त्यांच्याकडे डूंकूनही पाहिले नाही. शिवसेनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता असतानाही त्यांच्याकडून ग्रामीण भागात विकासाची कामे होत नाहीत. केवळ विकासाच्या नावाखाली गप्पा मारून पोकळ आश्‍वासने देण्याचे उद्योग सत्ताधारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असताना गावात बंधारे, सिमेंट रस्ते, अंगणवाडी इमारत आणि पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे विजयसिंह पंडित यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या भाषणाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शिवप्रेमी प्रतिष्ठान या संघटनेचे ज्ञानेश्‍वर गाडे, शरद फरताडे, सावता शिंदे, शरद शेरकर, किशोर ढगे, ज्ञानेश्‍वर शेरकर, रामेश्‍वर करपे, नाथा फरताडे, सचिन शेरकर, सतिष साठे, संतोष साठे, अनिरुद्र गाडे, पद्मसिंह करपे, संदीप परळकर, संदीप शिंदे, नारायण काशिद, विकास शेरकर, ईश्‍वर परळ, दादासाहेब घुंगरड, गोविंद शेळके, पांडूरंग शेरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. विजयसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमाला गावकर्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget