Breaking News

कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने दिले सानंदांना निवेदन सेलु येथील मुलीवर घृणास्पद कृत्य करणार्‍याला फाशी देण्याची मागणी


खामगाव,(प्रतिनिधी): पुसद तालुक्यातील सेलु येथे कुंभार समाजाच्या मुलीवर एका नराधमाने अतिशय घृणास्पद कृत्य केले. त्या नराधमास तात्काळ फाशी शिक्षा देउन पिडीत मुलीचे पुर्नवसन करावे या मागणीसाठी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ जिल्हा बुलडाणाच्या शिष्टमंडळाने 12 ऑक्टोंबर रोजी जनसंपर्क कार्यालय येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची भेट घेउन उपरोक्त मागणी संदर्भात निवेदन सादर केले व जातीने लक्ष घालुन गरीब कुंभार समाजाच्या पिडीत मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली. सानंदा यांनी कुंभार समाज बांधवांच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करुन या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचेशी चर्चा करुन या प्रकरणाचा पाठपुरावा करुन पिडीत मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. कुंभार समाजाच्या शिष्ट मंडळाने या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरीष्ठांना निवेदन पाठविलेले असुन निवेदनात आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावुन शासनाने पिडीत मुलीचे पुनर्वसन करावे जर शासनाने दखल घेतली नाही तर कुंभार समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे. 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.श्रीरामजी आमटे, महिला अध्यक्षा ज्योतीताई बावस्कार, कार्याध्यक्ष अ‍ॅड.मंगळवेडे, सचिव रविंद्रकुमार टाके, उपाध्यक्ष रामदास नावकार, भगवान लाहुडकार, विनोद लाहुडकार, राजाराम बेडोकार,अमोल सोनोने, धिरज कंठाळे, रामेश्‍वर कापडे, संजय लाहुडकार, अंबादास थोटे, गौरव मोरे, संजय धोडे, गणेश मासकर, गणेश कापडे, मंगेश कापडे, श्रावण मोरे, दिनकर नावकार, रवि बावस्कार, शालीग्राम थोटे, रामेश्‍वर कापडे, हरिदास बावस्कार, पुंडलीक मोरे, जानराव कापडे, श्रीहरी हिवरकार, सुधीर नावकार, रामदास सोनोने, अमोल सोनोने, सुरेश कंठाळे, रामलाल जावळे, नंदुभाउ थोटे,दिलीप थोटे यांच्यासह शेकडो कुंभार समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.