Breaking News

रोटरी मिडटाऊनच्या वतीने मदरसातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाज घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्य सुविधा निर्माण करणार्‍या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व सेक्रेड 90 ग्रुपच्या वतीने आलमगीर मदरसातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना औषधाचे वाटप करुन त्यांना पुढील उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे सचिव डॉ.विनोद मोरे, डॉ.विक्रम पानसंबळ, डॉ.प्रदिप चोभे, अ‍ॅड.अभय राजे, अ‍ॅड.एन.आर. गनबोटे, सेक्रेड 90 ग्रुपचे प्रणित अनमल, मोहसीन सय्यद, महेश कराचीवाला, विशाल शेटीया, मदरसा ट्रस्टचे चेअरमन मुजाहिद सय्यद, मुफ्ती अब्दुल हाफिज, हाफिज हारुन अख्तर, वसिम सय्यद, अय्युब शेख, गुलाम दस्तगीर, नूर शेख आदी उपस्थित होते.

रोटरी क्लबचे अध्यक्ष मनिष नय्यर यांनी रोटरी ही सर्व समाज घटकासाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, त्यांचे आरोग्य व शिक्षणावर क्लबने लक्ष केंद्रित केले आहे. निरोगी व सक्षम सुजान पिढी निर्माण करण्याच्या हेतूने रोटरीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.विनोद मोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असल्यास तो शिक्षणासह सर्वच क्षेत्रात आपली प्रगती करु शकतो. आरोग्यावर विद्यार्थ्याची गुणवत्ता टिकून असते. महागाईच्या काळात खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना परवडत नाही. रोटरी क्लब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यावर कार्य करीत असून, या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी या सेवाभावी संस्थेने मदरसामध्ये येऊन धार्मिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी मदरसा मधील दोनशे विद्यार्थ्यांची दंत व आरोग्याची तपासणी करण्यात आली.