Breaking News

राज्य भरातून लोटणार जनसागर-भन्ते धम्मशिल


बीड (प्रतिनिधी)ः-बीड जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा ६ वा वर्षावास सुरू आहे. या वर्षावासाच्या समापनानिमित्त भिक्खु संघदान सोहळ्याचे बीड शहरात रविवार (दि.४) नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी तब्बल शंभर भेन्तेंसह राज्यभरातून जनसागर लोटणार आहे. त्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. असल्याची माहिती सोहळ्याचे संयोजक भन्ते धम्मशिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार (दि.४) नोव्हेंबर रोजी बीड शहरात होत असलेला वर्षावास समापन व भिक्खु संघदान सोहळ्याच्या जय्यत तयारीची व ऐतिहासिक क्षणांची माहिती देण्यासाठी शहरातील शासकिय विश्रामगृह येथे रविवारी पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना भन्ते धम्मशिल बोलत होते. या एकतिहासिक सोहळ्याची माहिती पत्रकारांना देताना भेन्ते धम्मशिल म्हणाले की, हा सोहळा भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात संपन्न होतो आहे. या सोहळ्याचे उद्घाटन भिक्खु सध्दम्मादित्य सदानंद महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. 

अध्यक्षस्थानी भिक्खु धम्मसेवक महाथेरो असणार आहेत. भिक्खु शरणानंद महाथेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदिप उपरे असणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना भन्ते धम्मशिल असेही म्हणाले की, तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांचा बौध्द धम्म हा मानवाच्या कल्याणाचा धम्म आहे. या धम्मामध्ये जगण्याचा मार्ग बुध्दांनी सांगीतलेला आहे. त्यामुळे या धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. याकरिता हा ऐतिहासिक वर्षावास व भिक्खु संघदान सोहळा बीडमध्ये आयोजित केलेला आहे. या सोहळ्यात भिक्खु डॉ.खेमधम्मो महाथेरो, कश्यप महाथेरो, धम्मदिप महाथेरो, दशकाश्यपायन महाथेरा, डॉ. सत्यपाल महाथेरो, दयानंद महाथेरो, करूणानंद महाथेरो, काश्यप थेरो, हर्षबोधी थेरो, ज्ञानरक्षित थेरो, शिवलीबोधी थेरो, पय्यातीस थेरो, मदीतानंद थेरो, पय्यरत्न थेरो, महाविरो, पय्याबोधी, पज्ञापाल, महकाश्यप, धम्मधर, पय्यानंद, अश्‍वजित, सुभूती, शीलरत्न, बोधीशील, संघपाल, नागसेन, काश्यप, बोधीधम्म, संघप्रीय, रेवतबोधी एस.नागसेन, धम्मसार, चित्तज्योती, अश्‍वदिप यांच्यासह आदी भन्ते धम्मदेशना देणार आहेत. दरम्यान शहरात बुधवार (दि.२४) ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भव्य श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.