Breaking News

केज, धारूरात अधिकारी चुकीची आणेवारी दाखवतात मग सत्ताधारी पक्षाचे आमदार काय करतात- डॉ ओव्हाळ


धारुर(प्रतिनिधी) केज, धारूर तालुक्यात चुकीच्या आणेवारी मुळे शेतकरी हवालदिल झाला असून सत्ताधारी पक्षाचे आमदार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. शनिवारी धारुरसह केज तालुक्यातील शेतकरी बांधवांनच्या भेटी घेऊन सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी टीका केली अधिकारी चुकीची आणेवारी दाखवतात त्या वेळी हे आमदार काय करतात, चुकीची आणेवारी दाखवून शेतकर्यांचा घात होत असेल तर सत्ता जाळायची का? सोयाबीन करपलं, कापूस जळून गेला इतर पिकं हातातून गेलीत भीषण पाणीटंचाई समोर आली आहे याचे भान याना नसल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने दाखवलेली आणेवारी दुरुस्त करा नसता तोडांला काळे फिरण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे या वेळी राजेन्द्र गाडे, आकाश सोनवणे, तात्या गवळी, हिराचंद काळे, दत्ता इंगळे उपस्थित होते.