नगर व शिर्डीचे साटेलोटे अटळ; जागांसाठी पक्षांची ताणाताणी...


अहमदनगर/प्रतिनिधी- नगर लोकसभेच्या दक्षिण जागेवर राष्ट्रवादीकडून आ. अरुण जगताप (काका) यांचे नाव घोषित झाले आहे. मात्र, या जागेवर विखेंनी पुर्वीच झेंडा रोवून ठेवला आहे. तो उखडून फेकणे, वाटते तितके सोपे आहे? जशी शरद पवारांची खेळी कोणाला समजली नाही. तशी विखेंची खेळी तोंड दाबून असली तरी नंतर जगजाहीर होते. त्यामुळे कोणाचेही नाव पुढे येवोत, दक्षिणेत अतिक्रमण करणार्‍यांवर स्वारी करण्यासाठी विखेंचे वजीर पहिल्यापासूनच तैवारुन बसले आहेत. काकांची घोषणा ही सामान्य जनतेसाठी नवी आहे. त्यामुळे फटाक्याची आतिशबाजी झाली खरी. मात्र, ही केवळ जागा वाटपासाठी ताणाताण सुरू असून, हा एक राजकीय डावपेच आहे. यातून राजकीय रणसंग्राम दाखवायचा आणि पोळ्या भाजून घ्यायच्या. हेच वास्तव आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडेच जाणार आहे. हे साटंलोट अटळ असले तरी मात्र, काकांच्या नावाचा बोलबोला करुन ताणाताण करायची हेच यामागचे उद्दीष्ट आहे.दक्षिण लोकसभेतून दिल्लीत जाण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी सहा महिन्यापुर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यासाठी मोर्चे, अंदोलने, नागरिकांना सेलिब्रिटींचे दर्शन, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, शुभेच्छा व हाय हॉलो सुरू केले. यासाठी कोटींची रक्कम त्यांनी आजवर मोजली आहे. आणि आज दुपारी अचानक दक्षिणेवर काकांच्या नावाची चिंगारी पेटली गेली. विखे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सुर दिसून आले. तर दुसरीकडे काकांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. अर्थातच कार्यकर्ता अंधळा असतो, म्हणून तो झेंडे आणि फटाक्यांच्या माळा वाजविण्यात धन्यता मानतो. मात्र राजकीय डावपेच आणि गणिमी त्याच्यापासून कोसो दुर असतात. नको त्या चर्चेचे टेंभे तो मिरवत बसतो. म्हणून म्हणतात, वास्तव उभे राहोपर्यंत बोभाटा हा गावभर फिरुन आलेला असतो. तसेच चित्र नगरमध्ये निर्माण झाले आहे.

वास्तव पहाता, माजी मंत्री मधुकर पिचड अकोल्याासाठी सिमीत राहिले, आ.बाळासाहेब थोरात संगमनेरसाठी, काळे, कोल्हे कोपरगाव तर गडाख नेवाशासाठी मर्यादीत राहिले. दक्षिणेसह शहरातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. मात्र विराधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वत:चा वेगळा गट निर्माण करुन ठेवला आहे. जो सत्ताधारी होऊ शकत नाही. मात्र कुरघोडी करुन सत्ताधार्‍यांना घाम फोडू शकतो. त्यामुळे त्यांचे जिल्हासाम्राज्य सिमीत नाही. आपल्या पुत्रास दिल्ली दरबार दाखविण्यासाठी त्यांनी दक्षिण काबीज करुन कंबर कसली आहे. शिर्डीची जागा राष्ट्रवादीला देऊ करुन नगर दक्षिणच्या जागेवर ते अडून बसले आहे. या जागेचे इतिहास पहाता, दादापाटील शेळके वगळता राष्ट्रवादीच्या कोटात कधी यश आले नाही. राजीव राजळे यांच्यासारख्या भारदस्त व्यक्तमत्वास याजागेवर नतमस्तक व्हावे लागले आहे. अर्थात विखे गटाच्या-गटातटास मनाजोगा उमेदवार मिळाला नाही. तर त्यांनी सोसायटीपासून तर खासदारकीपर्यंतच्या उमेदवारास धडा शिकविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची अशी खेळी जगजाहीर आहे. स्वत: पक्षात राहुन त्यांच्या बंडखोरीच्या चर्चा रंगतात. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठीदेखील त्यांच्या शब्दाला खाली पडून देतील असे वाटत नाही.
गेल्या पंचवार्षीकमध्ये मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज घरी बसले. त्यामुळे अनेकांना घेऊन मोदींच्या विरोधात काँग्रेस मैदानात उतरली आहे. अशा परिस्थितीत विखेंनी पुन्हा बंडाची भूमिका घेतलीतर पक्षाला जड जाईल. याचे कारण म्हणजे, विरोधी पक्षनेते असतांना त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री फडणविस यांच्यासह भाजपच्या दिग्गजांना व्यासपिठावर आमंत्रीत केले होते. याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. दक्षिणेत डॉ.विखेंना उभे करण्यासाठी हा खटाटोप का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र खा. दिलीप गांधी यांचा बळकट पाय हलविण्यात त्यांना अपयश आले. आणि सर्व चर्चेस पुर्णविराम मिळाला. दक्षिण जागेवर राष्ट्रवादीला यश येत नाही. त्यामुळे शहर, पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुका, राहुरी, पाथर्डी याठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तसेच खुद्द विखेंची ताकद देखील बर्‍यापैकी आहे. त्यामुळे शिर्डी व दक्षिणचे साटेलोटे करुन डॉ. विखेंना दिल्लीची वारी करण्याचा मनसुबा विखेंनी आखला आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस जशी दक्षिणेत मजबूत आहे. तशी उत्तरेत काँग्रेस प्रबळ आहे. जर राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखेंना स्विकारले तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारास स्विकारले. या समझोत्यामुळे नगर जिलह्याच्या दोन्ही आघाडीच्या पारड्यात पडतील यात शंका नाही. मात्र कुरघोडीचे राजकारण नको. इतकीच त्याला अट आहे. रविवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या वतीने जागा वाटपाचा तिढा सुरू असताना आ. अरुणकाका जगताप यांचे नाव दक्षिण लोकसभेसाठी घोषीत करण्यात आले. अर्थात असे झाले तर राष्ट्रवादीत आनंदी आनंद असेल. मात्र डॉ. विखे यांना गुढग्याला बांधून ठेवलेले बांशिंग सोडणे. हे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे जागा वाटपात नगरची जागा काँग्रेसकडे येईल व शिर्डीची जागा राष्ट्रवादीकडे जाईल. यात तिळमात्र शंका काही.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget