Breaking News

सुटाबुटातील सरकार खाली खेचन्यासाठी कामाला लागा-पंडित


गेवराई (प्रतिनिधी)- गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढत असुन येणार्‍या काळात सर्वांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध तांडे आणि वस्त्यांमध्ये चांगले काम केले जाईल, त्यासाठी हे सुटाबुटातील सरकार खाली खेचने आवश्यक आहे. त्यांमुळे आपण सर्वांनी अंग झटकून काम सुरू करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. काठोडा तांडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शाखा शुभारंभ आणि जाहिर प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदामराव पंडित यांच्यावर टिकेचे झोड उठवत म्हणाले की, जय महेश कारखान्या बद्दल एक तर जयभवानी कारखान्याबद्दल दुसरी अशी दुटप्पी भुमीका घेऊन विरोधाचे राजकरण बदामराव खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

गेवराई तालुक्यातील काठोडा तांडा येथे गुरुवार दि. ११ आँक्टोबर रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शाखांचे उद्घाटन आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, पक्षाचे गेवराई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, नगरसेवक शाम येवले, सुभाष मस्के, अँ.आनंद सुतार, समाधान मस्के, सर्जेराव जाधव, सिद्धेश्वर काळे, रोहिदास चव्हाण, रवि शिर्के, संदिप मडके, दत्ता वाघमारे, अनिल पवार, बंडू घाटुळ, आण्णासाहेब मस्के, जयराम घाटुळ, दिलीप काळे, शिवाजीराव काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजयसिंह पंडित यांनी भाजप-सेनेच्या सरकारचा खरपुस समाचार घेतला. ते म्हणाले, या सरकारच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. लोडशेडिंग, फसलेली कर्जमाफी, नोटबंदी, तुर खरेदी बंद यामुळे जनतेची परेशानी वाढली आहे. या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे. येणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. तांडा, वाड्या आणि वस्त्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता येणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपण वाड्या, वस्त्या आणि तांड्यांना न्याय देण्याचे काम केले. सर्वांना निधीचे समान वाटप केले. माजी आ. अमरसिंह पंडित यांनी सभागृहात आवाज उठवून तालुक्यातील पाचेगावच्या तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळुन दिला. त्यामुळे तीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या. यापुढील काळातही आपण काठोडा तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली. बंदामराव पंडित यांच्यावर टिकेची झोड उठवत ते म्हणाले की, माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यासमोर शेतकरी उसाच्या पेमेंट साठी अंदोलन करत असुन त्या अंदोलनावर बदामराव दबाव आणत आहेत तर आपला जयभवानी कारखाना वेळेवर पेमेंट करत असला तरी केवळ त्याला विरोध करण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत. अशी दुतोंडी भुमिका त्यांची असल्याचे ते म्हणाले.