Breaking News

साठे यांच्या सदाशीवपेठी लिखाणाने बहुजनांच्या अस्मितेला मारला डंखछावा क्रांती वीर सेनेचा निर्वाणीचा इशारा गुन्हा नोंदवा,मुसक्या आवळा लिखाणावर बंदी घाला महाराष्ट्र शासनावर रोष
नाशिक/ प्रतिनिधी
प्रत्येक ब्राम्हण हा शिव द्वेषी नसला तरी शिव द्वेष करून छञपतींची बदनामी करणारा हा ब्राम्हणच का निष्पन्न होतो,असा संतप्त सवाल करून महाराष्ट्रातील शिव प्रेमींनी छञपती युवराज शंभुराजेंविषयी बदनामी करणार्या शुभा साठे यांच्या सदाशीवपेठी लिखाणाचा तिव्र निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हे विकृत लिखाण असलेला श्री समर्थ रामदास स्वामी हे पुस्तक सर्व शिक्षा अभियानातून हद्दपार करावे अशी मागणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदनातून केली जात आहे.दरम्यान छावा क्रांती वीर सेनेने महाराष्ट्र शासनाला निर्वाणीचा इशारा दिला असून या प्रवृत्तीना तात्काळ ठेचा,गुन्हे दाखल करा आणि लिखाणासह त्या पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी घालावी अन्यथा महाराष्ट्रात बहुजनांच्या भावनांचा उसळलेला आगडोंब शांत करणे कठीण होईल.

शुभा साठे लिखीत समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छञपती संभाजी राजे यांना व्यसनी ठरवून रामदासाला महान संत निर्देशीत करणारे लिखाण महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवप्रेमी बहुजनांच्या भावना भडकावण्यास कारणीभूत ठरले आहे.या बाईंनी लिखाण केलेले हे पुस्तक महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानमध्ये समाविष्ट केल्याने दुखावलेल्या भावनांवर मीठ चोळल्यागत वेदना असह्य झाल्याने महाराष्ट्रा तिव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
या संदर्भात छावा क्रांती वीर सेना आणि अन्य समविचारी शिवप्रेमी बहुजन संघटनांनी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्यांमार्फत महाराष्ट्राच्या भावना शासनाकडे पोहचवून शासनाला संभाव्य परिणामांबाबत अवगत केले आहे.
छावा क्रांतीवीर सेनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
छञपती शिवशंभूविषयी आकसाने बदनामी कारक लिखाण करणार्या विकृत बुध्दीच्या मुसक्या आवळाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तिव्र भावना उमटू लागल्या आहेत.
राजे शिवछञपती आणि युवराज शंभूराजे हे केवळ स्वराज्याचे रक्षणकर्तेच नाही तर तमाम बहुजन रयतेची आराध्य अस्मिता आहे.या अस्मितेला डंख मारून बहुजनांचा अवमान करणारे विषारी नाग वेळोवेळी संधी साधून आम्हा राष्ट्रीया दैवताला अवमानीत करीत असतात.सदाशीव पेठेत राहणारी अण्णाजी दत्तो या वंशावळीचा वारसा जपणारी नागीण पुन्हा एकदा आमच्या दंश करून बीळात घुसली आहे.छञपतींवर गरळ ओकणारी ही पिलावळ मुळात सडकी,कुजकी मानसिकता असणारी आहे.त्यांनी संत पद दिलेला रामदासी चांगला की वाईट या वादात आम्हाला पडायचे नाही.तथापी स्वतः डाॕक्टर म्हणविणार्या शुभा साठे साठे या बाईने आमची अस्मिता असलेल्या युवराज शंभूराजेंबद्दल अंत्यत घृणास्पद लिखाण केले आहे.तिचे हे लिखाण असलेले हे पुस्तक राज्य शासनाने सर्व शिक्षा अभियान मध्ये समाविष्ट करण्याची आगळीक करून आम्हा बहूजनांच्या जखमांवर मिठ चोळून जातीय द्वेष अधोरेखीत केला आहे.या निषेधार्ह कृत्यासाठी शुभा साठे ही बाई जेव्हढी जबाबदार आहे तेव्हढीच सर्व शिक्षा अभियानात या विकृत लिखाणाला स्थान देणार्या शासनातील सडक्या मनोवृत्ती जबाबदार आहेत.त्यांचा तिव्र शब्दात निषेध करून हे पुस्तक सर्व शिक्षा अभियानातून हद्दपार करावे,या लिखाणावर कायम स्वरूपी बंदी घालावी आणि बहुजनांच्या अस्मितेला डंख करणार्या या विषारी नागांचे तोंड कायद्याने ठेचावे,अन्यथा छञपतींची बहुजन रयत तिव्र आंदोलन छेडून या प्रवृत्तींना वेचून ठेचेल.आणि त्याची संपुर्ण जबाबदारी शासन प्रशासनावर असेल.असा इशाराही या निवेदनातून दिला आहे.या निवेदनावर छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रा.उमेश शिंदे,बाळासाहेब लांबे,शिवाजी मोरे ,शिवा तेलंग ,अरुण पाटील ,नितीन सातपुते ,गौतम वाघ ,सोमनाथ पवार ,आण्णासाहेब खाडे ,पुंडलिक बोडके ,मनोरमा पाटील ,पूजा धुमाळ ,रोहिणी दळवी ,मदन गाडे ,सुनील शेरताटे यांच्आया सह्दीया असून निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने छञपतींचे मावळे उपस्थित होते. छञपतींविषयी बहुजन समाज अतिशय संवेदनशील असून नाशिकसह प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जात असल्याचे करण गायकर यांनी यावेळी सांगीतले.


सोशल मिडीयावरून मोहीम झाली तिव्र
सोशल मिडीयावरूनही या विकृत बुध्दीची चिरफाड करणार्या पोस्ट व्हायरल होत असून या बदनामी षडयंञावर विविध सवाल उपस्थित केले जात आहेत.
संभाजी महाराजांची बदनामी करणा-या शुभा साठे या पक्क्या सावरकरवादी आहेत.
सहा सोनेरी पानांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन केलेल्या कृती अजाणतेपणाने होऊच शकत नाही,
त्यामुळे भंपक माफीनामा सादर करण्यापेक्षा लिखित सर्व साहित्य मागे घ्या,अशी पुरोगामी विचार मंचाची मागणी असणारी पोस्ट व्हायरल झाली आहे.


ब्राह्मण साठे बाईने छत्रपती संभाजी राजांची बदनामी केली आहे,तरी पण का गप्प आहेत कट्टर हिंदुत्ववादी संघटनां ? असा सवाल उपस्थित करून हिंदूत्व म्हणजे फक्त ब्राम्हणाची गुलामी हेच पुन्हा एकदा सिध्द झाल्याचा निष्कर्ष नेटीझन्स नोंदवू लागले आहेत.छञपतींची बदनामी करणारे लिखाण करणारा विद्वान प्रत्येकवेळी ब्राम्हणच का असतो असा चिकित्सक सवालही सोशल मिडीयावरून संतप्तपणे विचारला जात आहे.