काँग्रेसच्या इच्छुकांशी तांबेंनी साधला संवाद


नगर । प्रतिनिधी -
अहमदनगर मनपा निवडूणुक काँग्रेसकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. आत्तापर्यत 17 प्रभागांतील सुमारे 120च्यावर वर उमेदवारांनी संपर्क साधला आहे. अजून बराच काळ जायचा आहे. काँग्रेस संस्कृतीत जे होते ते पुन्हा पक्षाकडे येतील व पूर्ण ताकदीने मनपावर सत्ता मिळवू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

सत्यजीत तांबे यांनी नुकताच नगरमध्ये थांबून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष फिरोज खान, गौरव ढोणे, महिला अध्यक्षा सविता मोरे, नगरसेवक मुद्दसर शेख यांसह आजी- माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तांबे म्हणाले की, सर्व प्रभागांतून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात इच्छुकांशी व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधण्यासाठी प्रभाग निहाय बैठकांचे नियोजन केले गेले आहे. शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व प्रमुख पदाधिकारी सर्व प्रभागांतून जाणार असून, तेथील पक्षाचे इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांशी चर्चा करणार आहेत. संबंधित प्रभागांतील नागरिकांशीही यानिमित्ताने संवाद साधला जाणार आहे. सर्व 17 प्रभागांतून संपर्क मोहीम राबवताना पक्षाकडून इच्छुक असलेल्या 68 वर उमेदवार व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली जाणार आहे. प्रदेश पदाधिकार्‍यांसमवेत बैठकीत इच्छुकांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले 

तांबे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची निवडणूक आघाडी करून लढवण्याचे ठरवले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ स्तरावर असा निर्णय झाला असला तरी स्थानिक स्तरावर मात्र अशा संवादाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सन्मानजनक होणार आहे. स्थानिक काँग्रेसने चर्चेचा प्रस्ताव स्थानिक राष्ट्रवादीकडे पाठवला आहे. पण अजून त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे समजते.
दरम्यान, मागील 2013च्या निवडणुकीत काँग्रेसने 32 व राष्ट्रवादीने 36 जागा लढवल्या होत्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget