Breaking News

जिल्हा परिषदेची एलईडी गायब करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍याला कोणाचे अभय..!बीड (प्रतिनिधी)- बीड जिल्हा परिषद मधील संग्राम कक्षातील ३६ इंची एलईडी कार्यालय स्थलांतर करत्यावेळी येथील एका वरिष्ठ अधिकार्‍यांने आपल्या घरी घेऊन गेले होते. वर्ष उलटूनही जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर यांचे मनोरंजन सुरू असुन या प्रकाराकडे अधिकार्‍यांनी कानडोळा केला असल्याने यांना जाब कोण विचारणार हा 
प्रश्‍न जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना पडला आहे. मांशी शिंकली तरीही कार्यवाही करणारे कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी अमोल येडगे यांच्या नजरेतुन हा प्रकार कसा सुटला हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शासकीय मालमत्ता आपलीच आहे या आर्वीभावात वागणारा तो वरिष्ठ अधिकारी कोणालाच जुमानत नसल्याने एलईडीचा प्रश्‍न तसाच जिल्हा परिषद कर्मचार्‍यात रंगत आहे. 

तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या कार्यकाळात नुतन इमारतीसाठी फंड मंजुर झाला तात्काळ कामही सुरू झाले. ठेकेदाराला जिल्हा परिषद इमारत तोडण्याचे कंत्राट देण्यात आले. प्रशासकीय इमारत सहित विविध विभागाचे स्थालांतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील कन्या प्रशालेत जिल्हा परिषद हस्तांतरीत झाले. आपला गाशा गुंडाळून सर्वच कार्यलय या ठिकाणी आले. मुख्य कार्यालयात असणारे संग्राम कक्ष शासनाने बंद केले होते. त्यांचेही स्थलांतर करण्यात आले, मात्र या कार्यालयात विविध वस्तुंचे काय? झाले हा प्रश्‍न उपस्थित होत असतांना कार्यालयमध्ये ३६ इंची एलईडी येथील एका वरिष्ट अधिकार्‍याने घरी घेऊन गेले असल्याचे पुढे आले होते. वर्ष लोटून गेले तरीही या महाशयाने शासकीय मालमत्ता घरीच वापरत आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय मालमत्तेवर यांचे मनोरंजन सुरू आहे. या प्रकरणात मुख्यधिकारी अमोल येडगे यांनी लक्ष घातल्यास जिल्हा परिषदेची मालमत्ता परत मिळेल. नसता इतर साहित्याप्रमाणे एलईडीही दफ्तर दिरंगाईमुळे अडकून पडणार आहे.