काश्मीरमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा


श्रीनगर : सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी कुलगामा येथे चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवनांना यश आले आहे. दक्षिण काश्मीरच्या लारो भागात ही चकमक झाली. चकमकीत एक जवान जखमी झाल्याचे समजते. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली होती. या भागात एक ते दोन दहशतवादी घरात लपले असल्याची माहिती आहे. यादहशतवाद्यांनी  बारामुला भागातील करालहार येथे पोलिसांवर हल्ला केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. येथे पोलिसांनी 2 एके-47 बंदुका, ग्रेनेड लाँचर, 3 ग्रेनेड, 2 चीनी पिस्तुल आमि एक शस्त्र जप्त केले. 

तब्बल पाच तासांच्या चकमकीनंतर या अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

कुलगाम जिल्ह्यातील लारनू येथे काही अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी या संपूर्ण परिसराची घेराबंदी करत अतिरेक्यांचा शोध सुरू केला होता. यावेळी अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने जवानांनाही उलट गोळीबार करावा लागला. यावेळी दोन जवानांना गोळी लागल्याने त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जवानांनी आक्रमक कारवाई करत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. दरम्यान, या परिसरात आणखी चार ते पाच अतिरेकी लपून बसले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या परिसरात येणार्‍या वाहनांनाही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसेच अफवांना आवर घालण्यासाठी कुलगाममधील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget