तलवाड्यात कडकडीत बंद


तलवाडा/ उमापुर, (प्रतिनिधी):- इस्लाम धर्माचे प्रचारक हजरत मोहंम्मद पैगंबर (स.अ.) यांच्याविषयी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकुर पोस्ट केल्याच्या निषेधार्थ तलवाड्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व धर्मियांच्यावतीने आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली. उमापुरमध्येही प्रशासनाला निवेदन देवून समाजकंटकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे काल व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळून सोशल मिडीयावरुन महापुरुषांची बदनामी करणार्‍या समाज कंटकाचा निषेध नोंदवला. यावेळी ह.भ.प.गणेश महाराज कचरे, मौलाना जाकेर, महेश मरकड, शहेंशाहभाई सौदागर, नजीरभाई कुरेशी यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करुन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बदनामीच्या पोस्ट व्हायरल करणार्‍या समाज कंटकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी माजी सरपंच मोबीन खतीब, अक्रम सौदागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य शाम कुंड, राजाभाऊ विटकर, पत्रकार सुभाष शिंदे, तुळशीराम वाघमारे, शेख खलील मामू आदिंची उपस्थिती होती. उमापुरमध्येही याच प्रकरणात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. संबंधीत समाज कंटकाविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सोपान दळवी, रवि देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, दयानंद कापसे, जुबेर कुरेशी, इस्माईल शेख, हकीम पठाण, मतीन सौदागर, हकीम शेख, गफ्फार शेख, अशपाक शेख, अरबाज शेख, अजय आहेर, रिजवान शेख, शकील सौदागर, अखिल पठाण, शाहरुख मनियार, दत्ता वीर, नरसिंह तुरुकमारे, रवि बनसोडे, लायक कुरेशी आदिंनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget