Breaking News

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये जुंपलीसाताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिहराजे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. मात्र पोलिसांनी चक्क हात जोडून मध्यस्थी केली आणि वातावरण निवळलं. काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. 

जुना मोटार स्टँड येथे दोन नगरसेवकांच्या जागेच्या वादातुन दोन राजे आपापल्या समर्थकांसाठी समोर आले होते. दरम्यान, अजूनही घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या वर्षी कोजागीरी दिवशीच मोठा वाद झाला होता.