Breaking News

टँकर संदर्भात आ.पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक


गेवराई,(प्रतिनिधी): मतदार संघातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणी टॅकर, पालकमंत्री पादंन रस्ते योजना, अर्धवट पाणी पुरवठा योजना संदर्भात जि.प.मुख्यकार्यकारी आधिकारी व जिल्हाधिकारी याच्या कार्यालयात दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता बैठक आयोजित करण्यातआली आहे . याविषयी सविस्तर माहिती अशी की गेवराई मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गेवराई मतदार संघातील दुष्काळी आढावा बैठक आयोजित करून अर्धवट पाणी पुरवठा योजना संदर्भात व पाणी टँकर प्रस्ताव मंजुरी तात्काळ देण्यात यावी या संदर्भात जि.प.मुख्यकार्यकारी आधिकारी याच्या कार्यालयात दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी११:०० वाजता बैठक होणार आहे.