पो.उपनिरीक्षक मुंडेंंची हीरोगिरी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण दाखवले काढून


अंबाजोगाई,(प्रतिनिधी):- पदावर बसलेल्या अधिकार्‍यांनी ठरवले तर कायद्याची अंमलबजावणी कशी सक्षमपणे होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण अंबेजोगाईकरांनी अनुभवले शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सिंघम स्टाईलने सूचना देत एका दिवसामध्ये मुख्य रस्त्यावर चे अतिक्रमण काढून दाखवल्याने सर्वसामान्य जनतेतून मुंडेचे कौतुक होत आहे अंबेजोगाई शहरातील शिवाजी चौक, सावरकर चौक ,बस स्टॅन्ड, समोरील संरक्षण भिंती लगत थेट अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा टपरीधारक आपला व्यवसाय करताना रस्त्यावर टेबल खुर्च्या टाकून अतिक्रमण करत होते येणार्‍या गिर्‍हाईकाच्या मोटरसायकली पार मुख्य रस्त्याच्या मधोमध येत असल्याने अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला पादचार्‍यांनी जावे कुठून असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती एका दुकानदाराने रस्त्यावर पाय पसरले की प्रत्येक जण रस्त्यावर सामान मांडू लागला बस डेपो समोर तर खुल्या प्लॉटधारकांनी पत्र्याचे गाळे न काढून व्यापारी संकुल बनवले त्यात भाड्याने व्यवसाय करत असलेल्या व्यापार्‍यांनी अर्धा रस्ता काबीज केला होता या उलट जुने फर्निचर वाले तसेच रोपवाटिका व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांनी तर अर्धा रस्ता व्यापून टाकला होता त्यामुळे येणार्‍या व जाणार्‍या बस चालकांना मोठी कसरत करावी लागायची योगेश्वरी शाळेसमोर भेळच्या गाड्यांनी अर्धा रस्ता व्यापला होता तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सिमेंटचे दुकान ,हॉटेलचालक तसेच विविध व्यवसाय करणार्‍यांनी रस्ताच भाड्याने घेतल्यागत ताबा केला होता वाहतुकीला अडथळे निर्माण झाले या संदर्भात नागरिकांनी विविध संघटनांनी नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अतिक्रमण काढण्यास संदर्भात तक्रारी केल्या मात्र दोन्हीही प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने तक्रारदारांनी तक्रार देणे बंद केले यानंतर अतिक्रमण धारकात अतिक्रमण करण्याची स्पर्धाच लागली असल्याचे चित्र निर्माण झाले होते
अंबेजोगाईच्या शहर पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस उपनिरीक्षक मुंडेंना येऊन एक वर्षही झाले नाही त्यांनी काल दंगलग्रस्त पथकाला सोबत घेऊन शिवाजी चौक ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत पायी लॉगमार्च केला त्यावेळी अतिक्रमणधारकांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की उद्या पर्यंत तुम्ही तुमच्या हाताने अतिक्रमण काढून घ्या अन्यथा पोलीस प्रशासन आपले बळ वापरून अतिक्रमण काढले जाईल अशा पोलीस अधिकार्‍यांनी नुसत्या तोंडी सूचना करताच दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत अतिक्रमणधारकांनी जवळपास रस्ता मोकळा केला होता सकाळी पुन्हा पोलीस उपनिरीक्षक मुंडेंनी पोलीस फौजफाट्यासह याच रस्त्यावर लॉगमार्च केला त्यावेळी राहिलेले अतिक्रमण निघाले मुख्य रस्ता कुठलीही नोटीस न देता तोंडी सूचनेवरून अतिक्रमणमुक्त झाल्याने सिंघम स्टाइलच्या मुंडेच्या कार्यवाहीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget