Breaking News

जिल्हाधिकार्‍यासह नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना लोकमंथनचा सवाल


नाशिक : नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा हा टँकर.... सिन्नर तालुक्यात पाणी पुरवठा वाहतुक करतो. जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून साबांचे अनेक टँकर सिन्नर, पेठ सुरगाणा येवला अशा पाणी टंचाई भेडसावणार्‍या तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी वापरले जातात. यापैकी अनेक टँकरची पासींग झाली नसल्याची वाच्यता साबां वर्तुळात सुरू आहे. 

यासंदर्भात दै. लोकमंथनने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकार्‍यांनी साबांच्या प्रांगणात धाड मारून पासींग नसलेले टँकर जमा करण्याची धावपळ सुरू केली होती. तथापी यांत्रिकी विभागाच्या शाखा अभियंत्यांनी केलेले आर्जव कामी आले. त्यानंतर पासींग आणि इन्शुरन्स प्रक्रीया सुरू असल्याचे सांगीतले जात आहे. तथापी आमच्या ठिकठिकाणच्या वृत्तस्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पासींग आणि इन्शुरन्स नसलेले अनेक टँकर पाणी भरून धावत आहेत. त्यापैकीच हा एक टँकर.पासींग आणि इन्शुरन्स नसतांना शासकीय वाहन रस्त्यावर धावण्याचे समर्थन करतांना साबां यांत्रिकी विभागातील कर्मचारी थेट जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा हवाला देतात. विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या वाढत्या तक्रारीनंतर आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी पासींग आणि इन्शूरन्स नसलेले टँकर वापरण्याचा आदेश दिल्याची माहिती यांत्रिकी विभागातील क्लार्क श्रेणीतील कर्मचारी बिनबोभाटपणे देतात? आदेश तोंडी की लेखी हे मात्र सांगितले जात नाही. या टँकरला दुर्दैवाने एखादी दुर्घटनेला सामोरे जावे लागले तर त्याची जबाबदारी कुणावर निश्‍चित करणार? भरपाई कोण देणार? आरटीओ, जिल्हाधिकारी की यांत्रिकी विभाग? कशातून देणार? आणखी दिलस हे टँकर विनापासींग, विना इन्शुरन्स ररस्त्यावर धावणार?