Breaking News

लोकनृत्य स्पर्धेत परळीच्या मी हाय कोळी नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण


परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परळी कामगार कल्याण केंद्राकडून मी हाय कोळी हे लोकनृत्य सादर करण्यात आले. परळीच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

उस्मानाबाद येथील कामगार कल्याण भवनात शनिवारी या स्पर्धा संपन्न झाल्या. लोकनृत्य संघात अश्विनी जोशी, विजयमाला झाटे , निशिगंधा जोशी, अपर्णा जोशी, निकीता तपके, मनिषा पवार, प्रणिता सावजी, मोहिनी पवार, स्नेहा टेकाळे, श्रीहरी कवडेकर, कपील चौधरी, सोमनाथ सातपुते आदींचा सहभाग होता. संघातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल केंद्र संचालक आरेफ शेख यांनी अभिनंदन केले.