Breaking News

‘शिमला’शहराचे नाव बदलणार


नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर आता हिमाचल प्रदेश सरकार राज्याची राजधानी असलेल्या शिमला या शहराचेही नाव बदलणार असल्याची दाट शक्यता आहे. नाव बदलण्याच्या मागणीबाबत येथील सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केले आहे. 

शिमला या शहराचं नाव बदलून ‘श्यामला’ असं केलं जाणार असल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत. याशिवाय शहरातील, रिज, स्कँडल पॉईंट, पीटरहॉप, डलहौसी, व्हॉईसराय गिल अ‍ॅडव्हान्स स्टडी या ठिकाणांची नावंही बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विश्‍व हिंदू परिषद शिमला शहराचे नाव बदलण्याबाबत मागणी करत आहे. मात्र 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी शिमला हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याचे सांगत ती मागणी फेटाळली होती.