Breaking News

भागवत बंधुंकडून दिगंबर शेळकेच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत


येवला प्रतिनिधी
- लासलगाव शिवसेना विधानसभेचे संघटक तसेच येवला पंचायत समिती चे उपसभापती रुपचंद भागवत आणि नारायणगिरी महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेजपुर ( आसाम ) येथे निधन झालेले मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर शेळके यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी ( दि. 05 ) सांत्वन करून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडे माहिती देऊन जवान दिगंबर शेळके यांच्याविरोधात घडलेल्या अन्यायाला नक्कीच वाचा फोडली जाईल असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी केले.

यावेळी नारायणगिरी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष विष्णुजी भागवत ,उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख सुनील पाटील,42 गाव शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील,विंचूर चे माजी सरपंच राजाभाऊ दरेकर,शिवसेना दिंडोरी लोकसभा संघटक सर्जेराव सावन्त,नवनाथ खोडके,विलास भागवत,बाबासाहेब आहेर,दादाभाऊ वहाडणे,अस्मिता देशमाणे ज्ञानेश्वर भागवत,एकनाथ भालेराव, अप्पासाहेब भागवत,नंदू सोमासे,नानासाहेब भागवत,मनोज भागवत,यशवंत भागवत,देविदास जानराव,धीरज परदेशी, छगन आहेर,अनंता आहेर,सचिन खटकाळे,बाळासाहेब जगताप, बाबासाहेब तिपायले, नंदाराम शेळके,संदीप वावधाने, पोपट शेळके,विजय मोरे, राजू शेळके ,भाऊसाहेब फापाळे ,देवराम शेळके आदी शिवसेना नेते उपस्थित होते.