Breaking News

आडगावमध्ये एकाच पूर्ववैमनस्यातून खूनपाथर्डी प्रतिनिधी

तालुक्यातील आडगाव येथील अशोक शेंडे यांचे गुरुवारी दि. ११ अपहरण करत खून करण्यात आला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याची धक्कादायक घटना आज दि. १२ सकाळी १० च्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून खूनाची ही घडल्याचे बोलले जात आहे. 

याप्रकरणी राजू रभाजी शेंडे यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिली. यात म्हटले आहे, अशोक रभाजी शेंडे यांचे चंद्रकांत आनंदा बरफे, अमोल चंद्रकांत बरफे, सुरेश बरफे, शिवाजी बरफे यांनी गुरूवारी रात्री अपहरण केले. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यापूर्वीच शुक्रवारी दि. १२ सकाळी दहाच्या सुमारास लोहसर ते धारवाडी परिसरात अशोक शेंडे यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. शेंडे यांचे गुरुवारी रात्री शेतीतून अपहरण केले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी चौघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला. खूनाच्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत या गुन्ह्यातील एकाही आरोपी अटक झाली नव्हती.