Breaking News

पाथर्डी तालूका दुष्काळग्रस्त जाहीर करा


पाथर्डी प्रतिनिधी

तालुक्यात पावसाअभावी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाथर्डी तालूका दुष्काळग्रस्त जाहीर सध्याचे भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी नगरसेवक महेश बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की यावर्षी पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जो खर्च केला होता, तो या पिकांतून परत मिळणेसुद्धा कठीण आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नसुद्धा येणाऱ्या काळात उदभवू शकतो. हुमनीग्रस्त ऊसाचे पंचनामे करावेत, उर्वरित गावांच्या बोंड अळीचे पैसे तात्काळ जमा करावेत, छावण्या सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे, तालुक्यात व शहरात लोडशेडिंग करू नये, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, रोजगार उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी जमीर शेख, बंडू अकोलकर, रामदास सातपुते, नितिन कदम, शुभम सुपेकर, हनु बोरुडे, विकास शेळके, शरद सुपेकर, समीर पटेल, रमेश शेळके, विकास बोरूडे, बंडू कासुळे, आदिल पठाण आदी उपस्थित होते.