बन्नोमा देवी विकास आराखड्यासाठी पाठपुरावा करूः काकडे .


शेवगाव/प्रतिनिधी
बोधेगाव येथील साध्वी बन्नोमा देवी हे हिंदू मुस्लीम एकतेचे मोठे प्रतिक असून तालुक्यातील लोकांचे मोठे श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. या देवस्थानचा शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा ‘ब’ वर्गात समावेश करण्यासाठी पाठपुरावा करू. असे प्रतिपादन लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद व नियोजन मंडळ सदस्या हर्षदाताई काकडे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गुरुवारपासून सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असणार्‍या साध्वी बन्नोमा यात्रोत्सवात शुक्रवारी हर्षदाताई काकडे यांनी बन्नोमा चरणी जनशक्ती विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसह चादर अर्पण केली व देवीकडे दुष्काळी परिस्थितीत दुष्काळाला सामोरे जाण्याचे मनोधैर्य व ताकद शेतकर्‍यांना दे असे साकडे घातले. 

यावेळी संजयराव आंधळे, माणिक गर्जे, पंच कमिटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे, विश्‍वनाथ कुढेकर, सुभाष कुढेकर, चंद्रकांत वाबळे, राजेंद्र पालवे, संदीप जाधव, काशिनाथ काळे, नवनाथ फुंदे, भागवत रासनकर, शिवाजी रासनकर, भुजंगराव फुंदे, जयदीप घोरतळे, बबनराव घोरतळे, बप्पासाहेब घोरतळे, राजेंद्र भांगरे, सागर घोरतळे, ज्ञानदेव घोरतळे, व शिवतेज ग्रुपचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाल्या की, दुष्काळाच्या तीव्र झळा वाढत चालल्या आहेत. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, जनावरांसाठी चार्‍याचा प्रश्‍न, अशा बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जनावरांच्या चारा प्रश्‍नवरती, पाण्याच्या समस्या वरती सरकारने उपाययोजना करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. बोंडअळी ग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तसेच हातगाव व 28 गावांची प्रादेशिक पाणी योजना कार्यान्वित करावी. पाणी योजना अर्धवट अवस्थेत आहे ती पूर्ण करावी. शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी पीक विम्याची निकष न लावता त्यांना सरसकट पंचनामे करून प्रति हेक्टरी 30 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget