जनतेने धर्मांध व जातीयवादी युती सरकारला खाली खेचावेःअशोक चव्हाण...


कॉग्रेस पक्षाच्या जन संघर्ष यात्रेचे आज मालेगांव शहरात आगमन झाले असता कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ तुषार शेवाळे यांनी मोसम पुल येथिल आपल्या कार्यालयासमोर सभेचे आयोजन केले होते सदर सभेच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रमुख पाहुणे पृथ्वीराज चव्हाण हे होते
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर आरोप करीत सांगीतले की राफेल करार हा मोदींचा व्यक्तीगत भ्रष्टाचार असुन युती सरकार हे फसव सरकार आहे दोन दिवसांपुर्वी गडकरी खर तेच बोलुन गेले की भाजपाने अश्वासन पुर्ती न होणारीच अश्वासने जनतेला दिली आहेत, खोट बोलणारे भाजपा मंत्री कधी कधी खरपण बोलुन जातात असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी गडकरीनां लावला भाजपाने दिलेल्या अश्वासंनामुळे गलेमे अटकी हड्डी न ऊगलती है ' ना निगलती है अशी अवस्था भाजपा मंत्र्याची झाली आहे.
आघाडीचे सरकार सत्तेत असतांना 25 टक्के टँक्स होता आज तोच टँक्स 39 टक्के आहे त्यामुळे महागाई आसमानाला भिडली आहे विद्यमान सरकारच्या काळात राज्यात 16000 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे हे शासन निष्क्रीय असुन जनतेसाठी कुठल्याही प्रकारच्या ठोस योजना हे सरकार देऊ शकले नाही राज्यात बेरोजगारी वाढली असुन गरीब घटकांना शिक्षणांपासुन वंचीत ठेवण्याचा डाव हे सरकार करत आहे आम्ही सत्तेत असतांना राज्यावर 2 लाख 32 हजार कोटीच कर्ज होते आज तेच कर्ज 5 लाख कोटी झाल आहे ह्या सरकारला बँका कर्ज देत नाहीत म्हणुन आईल कंपन्यांच्या नावावर कर्ज काढल जात आहे म्हणुन येत्या लोकसभा व विधानसभासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे देखिल पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगीतले .
अध्यक्षीय भाषणात मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणविस यांचेवर टीका करतांना सरकारला धारेवर धरले, फडणविस हे गँस भरल्यामुळे गुटगुटीत झाले, सरकार प्रत्येक योजना ऑनलाईन करतय पण विजच नाही त्यामुळे जनतेची अवस्था ऑनलाईन व सरकार ऑफलाईन झाले आहे केंद्रात नरेंद्र,राज्यात देवेंद्र व जनतेला दारीद्रय करणारे हे भाजपा सरकार आहे. मालेगांव तालुका व ऊत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट असतांना याकरीता शासन व प्रशासन कुठलीही तरतुद करतांना दिसत नाहीये हे सरकार जाहीरातबाजी वर पैसे खर्च करणारे असुन जनतेच्या कामांसाठी यांच्याकडे पैसे नाही असा आरोप देखिल अशोक चव्हाणांनी केला, बेटी बचाव बेटी पढाव अस बोलण्याची परिस्थिती नसुन राज्यात व देशात महीलांनवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे महीलानवर अत्याचाराच्या घटनामधे भाजपाचेच पदाधिकारी असल्यामुळे बेटी भाजपा से बचाव म्हनन्याची वेळ आली आहे, आषाढी एकादशीला विठ्ठलानेच मुख्यमंत्र्याना दर्शनापासुन रोखले असे विधान यावेळी अशोक चव्हाण यांनी केले
शिक्षक आमदार डॉ सुधीर तांबे यांनी आपल्या मनोगतात युती शासनावर शेर रुपी आरोपात " एक ऊल्लु काफी होता है गुलिस्ता ऊजाडने के लिए, यहाँ तो हर डालपर ऊल्लु बैठा है, आशयाचा शेर सादर करताच जनतेत एकच हशा पिकला.
जन संघर्ष यात्रेस, खासदार हुसेन दलवाई कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आमदार आसीफ शेख आमदार निर्मला गावित,मा.मंत्री शोभाताई बच्छाव, जि.प. ऊपाध्यक्षा नयना गावित, डॉ तुषार शेवाळे,प्रमोद मोरे, डॉ हेमलता पाटील, प्रसाद हिरे,चंद्रकांत गवळी शांताराम लाठर सावळीराम आहिरे तसेच मालेगांव शहर व ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऊपस्थित होते

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget