Breaking News

ऊसतोड कामगारांसाठी केलेल्या योजना पंकजाताई राबविणारच -आंधळे


बीड(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या ना पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगारांसाठी मंत्री म्हणून त्यांच्या हातात जे होतं ते केलंच आहे, त्यांच्यासाठी केलेल्या योजना हया त्या राबविणारच आहेत हे निश्चित आहे, तथापि ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी लवादामध्ये चांगला निर्णय होऊ शकतो पण कांही विघ्नसंतोषी मंडळी यात खोडा घालत असल्याचा आरोप ऊसतोड मजूर संघटनेचे नेते, माजी आमदार केशवराव आंधळे यांनी पत्रकार परिषदेत केला.पुढे बोलतांना ते म्हणाले, ना. पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांच्या नेत्या आहेत.
कामगारांच्या नेत्याच सरकारमध्ये असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी व त्यांच्या उत्थानासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते मुंडे साहेबांच्या नांवाने सरकारी योजना व त्यासाठीचे बजेट देखील जाहीर केले आहे. योजनेसाठी २० कोटी रूपयांची केलेली तरतूद हे टोकन आहे.१०० कोटी लागल्यास आणखी निधी देण्याची तयारी त्यांनी दाखवली असल्याचे आंधळे म्हणाले.