Breaking News

महाशिबीरामधे घेतली योगिता गवळीच्या कामाची दखल


साक्षाळपिंप्री,(प्रतिनिधी): साक्षाळपिंप्री येथे विधीसेवा व न्यायविभागाच्या वतीने शासनाच्या पन्नास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवुन देण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन केले होते.यावेळी बीड जिल्हापरिषदेची स्वच्छतादुत बनुन स्वच्छ भारत मिशनसाठी काम करणारी कु.योगिता गवळी कार्याची दखल घेवून सिईओ मा.श्री.अमोल येडगे यांनी शालेय शिक्षण चालु असतांनादेखील हे काम करत असल्याबद्दल स्वच्छता विभागाच्या स्टॉलवर विशेष सत्कार करून योगिताच्या कामाचे कौतुक केले आहे. साक्षाळपिंप्री येथे विधीसेवा व न्यायविभागाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचावा यासाठी शासनाच्या पन्नास विभागाच्या महाशिबीराचे आयोजन केले होते.मुंबई उच्चन्यायालायाचे न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.ए.एस.ओक यांच्या अध्यक्षतेखाली तर न्यायमुर्ती श्री.आर.एम.बोर्डे,न्यायमुर्ती श्रीम.प्राची कुलकर्णी,विभागीय सहआयुक्त श्री.महेंद्र हरपळकर,जिल्हाधिकारीं एम.डि.सिंह, जि.प.चे मुख्यकार्यकरी अधिकारी श्री.अमोल येडगे आणि पोलीस अधिक्षक श्री.जी.श्रीधर,सिव्हील सर्जन,जिल्हा सरकारी वकील अँड.अजय राख,वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अविनाश गंडले यांच्यासह विविध विभागाचे सर्व आधिकारी यांच्या उपस्थीतीत मोठया उत्साहात संपन्न झाला.तसेच यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात योजनेचा लाभ उपस्थित लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.या महाशिबीरामधे जिल्हापरिषदेच्या स्वच्छता विभागाने सुद्धा दोन स्टॉल लावले होते.या स्टॉलवर थांबुन बीड जिल्हापरिषदेची स्वच्छतादुत म्हणुन काम करणार्‍या कु.योगिता आजीनाथ गवळी या शाळकरी मुलीने नगरिकांना शौचालयाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम केले.यावेळी बीड जिल्हापरिषदेच्या वतीने योगिताच्या कार्याची दखल घेवून सिईओ श्री.अमोल येडगे यांनी स्वच्छता विभागाच्या स्टॉलवर विशेष सत्कार करून तिच्या कार्याचे कौतुक केले.