जिल्हा वुशु संघाने जिंकली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी


जामखेड ता. प्रतिनिधी

राज्यस्तरीय वुशु अजिंक्यपद सब-ज्युनिअर व ज्युनिअर वुशु स्पर्धा वेरूळ, जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जामखेडच्या खेळाडूंनी २ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदके मिळवून पुन्हा एकदा मानाची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिल्ह्याला जिंकवून दिली. 

या विजयामध्ये सुवर्णपदक विजेते खेळाडू सुरेश तात्याराम राऊत, वैष्णवी महादेव पवार, रौप्य पदक विजेते अश्विनी जायभाय, संदेश गोरे, श्रेयेश वणवे, प्रणित वाव्हळ, कांस्य पदक विजेते मृदुला सातपुते आदींचा समावेश आहे. या स्पर्धेमधून सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड राष्ट्रीय ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व खेळाडूंना अ. नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू व एन. आय. एस. कोच प्रा. लक्ष्मण उदमले यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, ऑल महाराष्ट्र वुशु संघटनेचे सचिव सोपान कटके, जामखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शूभेच्छा दिल्या. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget