Breaking News

जवान कैलास कोठुळेचे भव्य स्वागत


श्रीरामपूर / प्रतिनिधी

तालुक्यातील शिरसगावचे सुपुत्र कैलास वेणुनाथ कोठुळे हे १७ वर्षांच्या आर्मी सेवेतून निवृत्त झाल्यावर गावी आले असता माजी सैनिक भगीरथ पवार, वर्गमित्र सरपंच आबासाहेब गवारे आदींनी

जवान कोठूळेचे जंगी स्वागत केले. सजविलेल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिरसगाव ग्रामपंचायत, पदाधिकारी आबासाहेब गवारे, राजेंद्र गवारे, प्रवीण गवारे, गोरख गवारे, बबनराव गवारे, शिवाजी गवारे, व्ही. डी. केदारी, भगीरथ पवार, लायन्स क्लब, श्रीरामपूरचे ओबेरॉय, डॉ. कुटे, लबडे, योगेश राणे, जयहिंद अकादमीचे सुयोग रासस्कर, माजी सैनिक भगीरथ पवार, जगन्नाथ जाधव, शंकर गवारे, भाऊसाहेब यादव, प्रकाश गवारे, भाऊसाहेब जाधव आदींसह ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.