दुचाकीस्वारांची लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश


सातारा (प्रतिनिधी) : सातारा-कोरेगाव रस्त्यावर शहरालगत दुचाकीवरील युवकाला लुटमार करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी गणेश शंकर माळवे (वय 20, रा. पांचागणे वर्धनगड), सचिन विजय बुधावले (वय 21, रा. पो. वर्धनगड), पवन मधुकर बुधावले (वय 19, रा. वर्धनगड सर्व ता.कोरेगाव) या तिघांना अटक केली आहे. एक आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावत कोरेगाव तालुक्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अक्षय जाधव (रा. जळगाव, ता. कोरेगाव) याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अक्षय जाधव हा युवक सुर्योदय कॉलेज येथील रस्त्यावर थांबला होता. यावेळी अनोळखी युवकांनी तेथे जावून तक्रारदार युवकाला चाकूचा धाक दाखवून दगडाने मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार युवकाचा मोबाईल व रोख 1000 रुपये असा एकूण 25 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. चोरीच्या घटनेनंतर जखमी युवकाने शहर पोलीस ठाण्यात दिली. या जबरी चोरीची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर 3 संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांकडे चौकशी केल्यानंतर संशयितांनी जबरी चोरीची कबुली दिली. यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा मोबाईल जप्त केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक बी. जी. ढेकळे यांच्या सहकार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget