मंदाबाई कापरे यांना आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार


भाविनिमगाव/प्रतिनिधी 
शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथील अंगणवाडी मदतनीस मंदाबाई सोन्याबापु कापरे यांना यावर्षीचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार नुकताच जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री ना. राम शिंदे, जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

यावेळी सभापती अनुराधा नागवडे, जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, संगिता दुसंगे, प्रकल्पाअधिकारी संगिता पालवे आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल भाविनिमगाव सिमाताई शिरसाठ, पांडुरंग मरकड, मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय शेळके, शंकर मरकड, कुसुमताई राजगुरू, पुष्पाताई काळे, ताराबाई घनवट आदींसह परीसरातुन अभिनंदन होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget