Breaking News

साक्षाळपिंप्री हायस्कुलच्या साधना आर्सुळ यांना राष्ट्रशिल्पकार पुरस्कार


बीड  (प्रतिनिधी): रोटरी क्लब ऑफ बीड तर्फे राष्ट्रशिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ६ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह बीड येथे संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती आर्सुळ साधना सोपान यांना प्राचार्या डॉ. दिपाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्त राष्ट्रशिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साक्षाळपिंप्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साक्षाळपिंप्री येथील आर्सुळ साधना यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक संस्थेचे सचिव आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर, तसेच संस्थेचे प्रशासक राजू मचाले सर, कार्यवाहक व्ही एल. क्षीरसागर सर, माजी प्राचार्य राऊत एम.ए. सर, प्राचार्य येवले ए.बी.सर, शाळेचे पर्यवेक्षक काळे जे.एम. सर, तसेच सिद्धेश्वर आर्सुळ, डॉ.कल्याण काशिद, पत्रकार योगेश काशिद, ग्रा.पं.सदस्य अर्जुन नरवडे, ज्ञानेश्वर काशिद, रामकृष्ण गोळेकर, शंकर आर्सुळ, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच साक्षाळपिंप्री परिसरातील सर्व पालकांनी श्रीमती आर्सुळ यांचे अभिनंदन केले आहे.