डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार आज ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार प्रदान


बीड, (प्रतिनिधी):- पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार सुनिल डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज रविवार (दि.१४) ऑक्टोबर रोजी ना.धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हार सेना बीड, धनगर समाज कर्मचारी महासंघ, अहिल्या महिला महासंघ यांच्या वतीने समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तिंना आदर्श शिक्षक, गुणवंत कर्मचारी व समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. या वर्षाचा समाजभूषण पुरस्कार हा पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार सुनिल डोंगरे यांना जाहिर झाला असून आज रविवारी हा पुरस्कार त्यांना माजी मंत्री तथा धनगर समाज महासंघाचे संस्थापक आण्णासाहेब डांगे,ना. धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री प्रकारश सोळंके, संदिप क्षीरसागर, माजी.जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, डॉ.शिवाजी राऊत, बबनराव सरवदे, माधवराव निर्मळ यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. असल्याची माहिती धनगर समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाअध्यक्ष अंकुशराव निर्मळ, मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख अमर ढोणे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाअध्यक्ष ऍड. रणजित करांडे, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोंडवे यांनी दिली.पत्रकार सुनिल डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याद्दल घोंगडीचे संपादक बंडू खांडेकर, डॉ. नंदकुमार उघाडे, डॉ.उद्वव काळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश खेमाडे, विचारवंत साहित्यीक केशव वघमारे, भारिपचे मराठवाडा नेते अनिल डोंगरे, संपादक सुंदर देशमुख, लढा मानवमुक्तीचे सचिन उजगरे, शेकापचे ऍड.नारायण गोले, कुमार सोळंके, संभाजी ब्रिगेडचे रंजित जाधव, भाजपा ग्रंथालयाचे प्रदेश निमंत्रक राहूल वाघमारे, कालिदास लोंढे,पत्रकार मिलिंद चोपडे, पत्रकार राजेभाऊ पास्टे, सरपंच अंगद कटके, माजी सरपंच राजकुमार आब्दल, सरपंच दत्ता लाटे, इंजि.गजानन लाटे, राज वाव्हळे, वैभव सोनवणे, समाधान सोनवणे, ऍड.सुरेश पौळ, अविनाश पौळ, यांच्यासह आदींनी अभिनंदन केले असून त्यांच्या पत्रकारितेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget