Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

माजलगाव,(प्रतिनिधी) : शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा या व इतर मागण्यासाठी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल सकाळी ११ वा परभणी फाटा येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला. 


या विषयी वृत्त आसे की येथील स्वाभिमानि शेतकरी संघटनेच्या वतीने दि १९ रोजी तहसिलदार याना निवेदन देऊन या वर्षी पाऊस फार कमी झाल्याने आध्याप पेरण्या झाली नसल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी ,शेतकर्‍यांच्या जनावरांना दावणीला चारा पाणी द्या , बोन्ड अळीचे पैसे तात्काळ द्या , सरसगट कर्जमाफी द्या , तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा या सह विविध मागण्यांसाठी काल दि २० रोजी सकाळी ११ वा परभणी फाटा येथे १ तास भव्य असा रस्ता रोको करण्यात आला मागण्याचे निवेदन संबधित अधिकारी यांना देण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित नाटकर , अशोकराव नरवडे पाटील ,लिंबाजी लाखे ,शाकेर पटेल , उद्धवराव साबळे ,प्रदीप शेजुळ व इतर शेतकरी उपस्तीत होते.