Breaking News

ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेसचे धरणे आंदोलन


ठाणे : प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेत नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असल्याने याला आयुक्त जबाबदार आल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मिलिंद खराडे यांच्या नेतुत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यानी आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे.काम कमी वाद जास्त.दररोज नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. बीएसयुपी,टीडीआर,आदिवासी जमीनीवर बांधकाम,नाले सफाई,रस्ता बांधकाम घोटाळे,थीम पार्क,परिवहन घोटाळा,पुनर्वसन घोटाळा,अशा अनेक प्रकरणात अपयशी ठरले आहेत.आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी क्लस्टरच गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याना ३० ऑगस्ट 2018 रोजी पत्र देण्यात तक्रार करण्यात आली . वादग्रस्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची तात्काळ बदलीची मागणी पुन्हा एकदा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात येत आहे.