Breaking News

राजकोट येथे भारत राजा, मालिकेत आघाडी


वृत्तसंस्था - वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करुन मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने 1 डाव आणि 272 धावांची सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात वेस्ट इंडिजचा संघ 196 धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसर्‍या डावात कुलदीप यादवने 5, रविंद्र जाडेजाने 3 तर रविचंद्रन आश्‍विन 2 विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. राजकोट कसोटीच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 5 विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.