Breaking News

महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.मोदी तर उपाध्यक्षपदी सौ.धर्मपात्रे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सन २०१८ ते २०२३ या पंचवार्षीक निवडणूकीत सौ.सुनिता राजकिशोर मोदी यांनी अध्यक्ष म्हणून व सौ. रूपाली सुधीर धर्मपात्रे यांची उपाध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित सर्व संचालिकांचे अभिनंदन होत आहे.

२१ जून २०१६ रोजी संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरातील महिला यांनी सहकार क्षेत्रात पुढे यावे,महिला उद्योजकांना,महिला व्यवसायिकांना आपल्या पायावर आत्मनिर्भर होता यावे. या भूमिकेतून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेने अल्पावधीत अंबाजोगाई शहरातील महिला भगिनींचा, सभासदांचा, ठेवीदारांचा विश्वास संपादन केला.ही पतसंस्था अंबाजोगाईच्या अर्थकारणाला बळकटी देण्याचे काम करित आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर या पतसंस्थेची आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे सभासद संख्या ३२५५, सभासद भागभांडवल १४ लाख ८१ हजार, कर्ज वाटप ६८ लाख, ठेवी १ कोटी ७० लाख तर पतसंस्थेने अंबाजोगाई पिपल्स बँकेत सुमारे १ कोटी ५४ लक्ष रूपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत.नित्य निधी ठेव,बचत ठेव व पतसंस्था संपुर्णपणे संगणकीकृत जलद सेवा देत आहे.हेच या पतसंस्थेचे वैशिष्ट्य आहे.पतसंस्थेच्या सन २०१८ ते २०२३ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सौ.सुनिता राजकिशोर मोदी,सौ.शोभा बाबु खडकभावी,सौ.रुपाली सुधीर धर्मपात्रे, फारूखी नुजहत परवीन,सौ.सायली सुहास मोहिते, सौ.अंजली विष्णुपंत मस्के,सौ.राजश्री राहुल धाकडे,सौ.उषा गणेश मसने,सौ.सविता विजय रापतवार,सौ.सुरेखा बाबुराव खंडाळे, सौ.संगीता विष्णु सरवदे या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांची नुकतीच पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक होवून सर्वानुमते पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.सुनिता राजकिशोर मोदी व उपाध्यक्षपदी सौ.रूपाली सुधीर धर्मपात्रे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा यावेळी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन कुलकर्णी,महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापक म्हणून मनिषा आदी.