Breaking News

ऊस बिलाचे २९ कोटी आक्टोबरअखेर वर्ग करू : डॉ. घुले


भेंडा/ प्रतिनिधी

कारखान्याच्या गळितास आलेल्या ऊस बिलाची रक्कम, परतीच्या ठेवी आणि ठेवींवरील व्याजाची रक्कम असे एकूण २८ कोटी ९६ लाख १३ हजार रुपये ऑक्टोबरअखेर संबंधित शेतकऱयांच्या बँक खाती वर्ग करणार आहोत, अशी माहिती ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आ. डॉ. नरेंद्र घुले यांनी दिली.
भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक विधिज्ञ देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, दिलीप लांडे, कॉ. बाबा आरगडे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी दत्तात्रय गटकळ, शोभा गटकळ, जनार्दन शेळके, शांता शेळके, पंडित भागवत, कमल भागवत, मछिंद्र साळुंके, लता साळुंके या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली. डॉ. घुले म्हणाले, ज्ञानेश्वर कारखान्याच्या कामगारांनी अपेक्षित कार्यक्षमतेने नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ भरणे काढणे गरजेचे असतांना आमच्या हक्काचे पाणी पळविले जात आहे. मात्र टेलपर्यंत पाणी मिळावे, यासाठी आमदारसुद्धा टेलचाच असावा लागतो. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक विधिज्ञ देसाई देशमुख, काशिनाथ नवले, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संचालक मोहनराव देशमुख, प्रा. नारायण म्हस्के, रावसाहेब निकम, मोहनराव भगत, शिवाजीराव गवळी, अनिल हापसे, शिवाजी मोरे, विष्णू फटांगडे, पंडित भोसले, जगन्नाथ कोरडे, अशोकराव मिसाळ, डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र मते, माणिकराव थोरात, जि. प. सदस्य दत्तात्रय काळे, दादा गंडाळ, नवनाथ साळुंके, नेवासाचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, विधिज्ञ बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब आगळे, लक्ष्मण बनसोडे, ज्ञानदेव दहातोंडे, लक्ष्मण काळे, अशोक वायकर, दिलीप सरोदे, दत्तात्रय खाटीक, भानुदास कावरे, दत्ता माळवदे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, मिलिंद कुलकर्णी, गोरक्षनाथ कापसे, अशोक चौधरी, बबनराव पिसोटे, राजेंद्र परसय्या, हुकूमबाबा नवले, कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापूसाहेब सुपारे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, मछिंद्र वेताळ, संभाजी माळवदे, बबनराव धस, रामभाऊ पाऊलबुद्धे, राजेंद्र वाणी, जालिंदर विधाटे, तुकाराम काळे, काकासाहेब काळे, दिगंबर रिंधे, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर एस. डी. चौधरी, चिफ केमिस्ट एम. एस. मुरकुटे, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी के. एन. गायके, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, शेतकी अधिकारी सुरेश आहेर आदी उपस्थित होते. गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.