Breaking News

पाथर्डीच्या जनसंघर्ष यात्रेला उपस्थित रहा : विखे


लोणी / प्रतिनिधी

केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या जनविरोधी धोरणांचा आणि अपयशी अशा साडेचार वर्षातील कारभाराचा पंचनामा करण्‍यासाठी संपूर्ण राज्‍यात सुरु करण्‍यात आलेली जनसंघर्ष यात्रेतून सर्वसामान्‍यांचा आवाज आता रस्‍त्‍यावर आला आहे. या दोन्‍हीही सरकार विरोधात जनतेची भावना अधिक तीव्र बनत चालली आहे. पाथर्डी येथील जनसंघर्ष यात्रेच्‍या सभेतून सरकार विरोधातील एल्‍गार व्‍यक्‍त होणार आहे. त्यामुळे या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी केले आहे.

जनसंघर्ष यात्रेच्‍या पार्श्वभूमीवर लोणी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम आणि उत्‍तर महाराष्‍ट्रात या जनसंघर्ष यात्रेला सामान्‍य माणसाचा मिळालेला प्रतिसाद आणि यात्रेच्‍या निमित्‍ताने सरकारच्‍या विरोधात असलेल्‍या तीव्र भावना या अनुभवता आल्‍या आहेत. मागील साडेचार वर्षांत केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांचा कोणताही लाभ सर्वसामान्‍य माणसांना झालेला नाही. याची तीव्र प्रतिक्रिया आता जनतेमधूनच उमटत आहे, हे या यात्रेच्‍या निमित्‍ताने दिसून आले आहे.