Breaking News

विविध मागण्‍यांसाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्‍या वतीने येवल्‍यात जाहीर मोर्चाचे आयोजन - साहेबराव मढवई


येवला : वाढती महागाई, पाणी टंचाई, शासनाची शेतक-यांकडुन सुरु असलेली सक्‍तीची वीजबील व कर्जवसुली, पिण्‍याच्‍या पाण्‍याचा व शेतीच्‍या पाण्‍याचा गंभीर बनलेला प्रश्‍न, पालखेड कालव्‍याचे आवर्तन बाबत अनिश्वितता, येवला तालुका दुष्‍काळी जाहीर करणे, मांजर पाड्याचे रखडलेले काम लवकर पुर्ण करणे या विविध प्रश्‍नांवर चर्चा करणे साठी व धडक मोर्चाचे नियोजन करण्‍यासाठी मा. भूजबळ साहेबांच्‍या संपर्क कार्यालयात दि. 21 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता बैठक होऊन नियोजन करण्‍यात आले, व सर्वसंमतीने मंगळवार दि. 23 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी ठिक 10.00 वा. येवला संपर्क कार्यालय पासुन तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा नेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

बैठकीच्‍या अध्‍यक्ष स्‍थानी अॅड. माणिकराव शिंदे, प्रांतिक सदस्‍य हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्‍ये प्रांतिक सदस्‍य अंबादासजी बनकर, अरुण मामा थोरात, किशोर सोनवणे,राधाकिसन सोनवणे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, दिपक लोणारी, साहेबराव आहेर, भागवत सोनवणे, अॅड. सुभाष भालेराव, रंगनाथ भोरकडे, देवीदास शेळके, भगवान ठोंबरे, नवनाथ काळे, अशोकराव मेंगाणे, विनायक भोरकडे, दिपक देशमुख, सुभाष निकम, संजय बनकर, पुंडलीक कदम, आण्‍णासाहेब दौंडे, अंबादास शिनगर, गणपत कांदळकर, कोंडाजी कदम, तुळशीराम कोकाटे, प्रविण पहिलवान, मुशरीफ शाह, विजय खोकले, सुभाष गांगुर्डे सौ. शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, विमलबाई शाह आदि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी अॅड. माणिकराव शिंदे, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, साहेबराव आहेर, किशोर सोनवणे, भागवतराव सोनवणे, हरिभाऊ जगताप आदी पदाधिका-यांनी मोर्चा संबंधी विषयावर आपले वेगवेगळे विचार मांडले व मोर्चात जास्‍तीत जास्‍त शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्‍यांनी हजारोंच्‍या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्‍वी करण्‍याचे आवाहन केले. प्रस्‍ताविक व आभार साहेबराव मढवई यांनी केले.