Breaking News

पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वैष्णोदेवीची आरती


बीड (प्रतिनिधी)- शहरातील विप्रनगर येथील श्री वैष्णोदेवी मंदिरात बुधवार दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी पेठ बीड ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब बडे यांच्यासह वैष्णोदेवी मंदिर संस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक भक्त उपस्थित होते.विप्रनगर येथे गेल्या ११ वर्षापूर्वी संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून वैष्णोदेवीचे मंदिर उभारण्यात आले असून या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बुधवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.हे मंदिर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान नवरात्रीच्या पावन पर्वावर भाविक भक्तांचा दर्शनासाठी ओघ चालु आहे व ट्रस्टतर्फे सर्वांची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

दिव्यांच्या रोषणाईने मंदिराच्या सुबकतेत भर घातली आहे. शहरातील तसेच आजुबाजूंच्या गावातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी यांनी केली आहे. नवरात्र महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संजय सोहनी, शिवप्रसाद दायमा, गोविंद तोष्णीवाल, मोहित कासट, प्रमोद रामदासी, खुशालचंद पारिख, पवन शर्मा, सुरज लोहीया, गणेश गवळी यासह मंदिराचे सर्व ट्रस्टी व विप्रनगरातील रहिवासी परिश्रम घेत आहेत.