Breaking News

काँग्रेसला अच्छे दिन?राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत मतदान होणार असून, 11 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. नक्षलग्रस्त भागातील 18 मतदारसंघांमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून, उर्वरित 73 मतदारसंघांत 20 नोव्हेंबरला मतदान होईल, असं निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी जाहीर केलं. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गेल्या महिन्यात अचानक विधानसभा विसर्जित केल्यामुळं या राज्यात मुदतपूर्व निवडणूक होत आहे. मतदार याद्या तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा़, यासाठी अखेरच्या टप्प्यात तेलंगणमध्ये मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबपर्यंत मतदार याद्या बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा रावत यांनी व्यक्त केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळं पाचही राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. पाचही राज्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघातील किमान एका मतदान केंद्रात निवडणुकीची प्रक्रिया पूर्णत: महिला पार पाडतील.

निवडणूक आयोगानं पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं आणि नेमके त्याच दिवशी निवडणूकपूर्व पाहण्यांचा अंदाज व्यक्त होणं, हा निव्वळ योगायोग असला, तरी त्यामुळं काँग्रेसच्या गोटात हत्तीचं बळ आलं नाही, तरच नवल. निवडणूक आयोगानं कर्नाटकच्या निवडणुकीच्या घोषणेच्या वेळीही आपण भाजप सरकारच्या हातचं बाहुल आहोत, हे सिद्ध केलं होतं. त्या वेळी निवडणूक आयोगाच्या आधी भाजपकडं निवडणुकीचा सारा तपशील होता, तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेरच्या सभेसाठी दुपारी बोलविलेली पत्रकार परिषद तीन तास लांबणीवर टाकण्यात आली, त्यावरून निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेची कल्पना यावी. चार राज्यांच्या विधानसभेच्या संपलेल्या मुदती आणि तेलंगणा राज्यानं अगोदरच विधानसभा बरखास्त केल्यानं तिथं कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होतीच. त्यानुसार आता
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत मतदान होणार असून, 11 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. नक्षलग्रस्त भागातील 18 मतदारसंघांमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून, उर्वरित 73 मतदारसंघांत 20 नोव्हेंबरला मतदान होईल, असं निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी जाहीर केलं. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गेल्या महिन्यात अचानक विधानसभा विसर्जित केल्यामुळं या राज्यात मुदतपूर्व निवडणूक होत आहे. मतदार याद्या तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा़, यासाठी अखेरच्या टप्प्यात तेलंगणमध्ये मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबपर्यंत मतदार याद्या बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा रावत यांनी व्यक्त केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळं पाचही राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. पाचही राज्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघातील किमान एका मतदान केंद्रात निवडणुकीची प्रक्रिया पूर्णत: महिला पार पाडतील. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ब्रेल लिपीतही पोलिंग स्लिप’ उपलब्ध करून दिली जाईल, हा निवडणूक आयोगाचा उपक्रम स्तुत्य आहे. एकाच मतदारसंघात एकाच नावाचे उमेदवार उभे केले जातात. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, याची खबरदारी निवडणूक आयोगानं घेतली असून आत मतदानयंत्रांवर पक्षाच्या निशाणीबरोबरच उमेदवाराचं छायाचित्रही असेल. निवडणूक आयोगानं याआधीच समाजमाध्यमांवरून होणार्‍या प्रचारावर देखरेख ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळं या निवडणुकीपासून प्रत्येक उमेदवाराला समाजमाध्यमांवरील खात्यांची माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक असेल. आचारसंहितेचे सर्व नियम समाजमाध्यमांनाही लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं मतदानाआधी 36 तास समाजमाध्यमांवरूनही प्रचार करण्यास बंदी असेल. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त राहिला नसल्याची टीका काँग्रेसनं केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगानं दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद बोलावली होती, ती अचानक तीन वाजेपर्यंत पुढं ढकलण्यात आली. राजस्थानात अजमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा होती. त्यांना ती सभा घेता यावी, यासाठी निवडणूक आयोगानं तारखा जाहीर करण्यात दिरंगाई केली’, असं ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केलं. या टीकेचा रावत यांनी समाचार घेतला असला, तरी वस्तुस्थिती बदलत नाही. पाच राज्यांतील निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर एक सर्वे समोर आला आहे. या सर्वेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जादू चालणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एबीपी-सी व्होटर च्या सर्वेनुसार भाजपची चिंता वाढली आहे, तर काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. या सर्वेनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तिन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. काँग्रेसला या राज्यांमध्ये बहुमत मिळू शकतं, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात 2003 पासून भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिमा चांगली असली तरी व्यापम घोटाळा, मंदसौरला शेतकर्‍यांवर झालेला गोळीबार, त्यात सहा शेतकर्‍यांचे गेलेले बळी, भावांतर योजनेचे अपयश, निवडणुकीच्या तोंडावर कम्प्युटर बाबांनी दिलेला राजीनामा, 15 वर्षे सत्तेत असल्यानं सरकारच्या विरोधातील नाराजी हे घटक भाजपसाठी घातक ठरू शकतात. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा 122 जागांवर विजय होईल, तर भाजपला 108 जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. असं झालं तर 15 वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसचे जोरदार पुनरागमन होईल. अर्थात दोन्ही पक्षांच्या जागांत फारसा फरक नाही. त्यामुळं काँग्रेसला तिथं जास्त बारकाईनं काम करावं लागेल. कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील गटबाजी संपवावी लागेल. त्यातच मायावती यांनी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेसला फार हुरळून जाऊन चालणार नाही. मायावती यांच्या पक्षाला मागच्या निवडणुकीत चार टक्के मतं मिळाली होती. दुसरीकडं छत्तीसगडमध्ये भाजपला मोठ्या पराभला सामोर जावं लागू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. छत्तीसगडमधील 90 जांगापैकी 47 जागांवर विजय मिळवून काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावा या सर्वेमध्ये करण्यात आला आहे. भाजपला 40 जागांवर समाधान मानावं लागेल. अर्थात इथंही दोन्ही पक्षांतील जागांत फार कमी तफावत असेल. काँग्रेसचे बंडखोर, माजी मुख्यमंत्री अजित जोगी व मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं इथं युती केली आहे. तिचा किती फटका काँग्रेसला बसतो, यावर भाजपचं भवितव्य अवलंबून आहे. राजस्थानात 1993 पासून भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्ता मिळाली आहे. ही पंरपरा कायम राहिल्यास यंदा काँग्रेसला संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी सत्ता कायम राखण्याकरिता जोर लावला आहे. सर्वेनुसार, राजस्थानमधील दोनशे जागांपैकी भाजपला फक्त 56 जागा मिळणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्येही वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये 142 जागावर विजय मिळवत काँग्रेस सत्तेचा दावा ठोकण्याची शक्यता सर्वेतून व्यक्त करण्यात आली आहे. एवढं एकच राज्य काँग्रेसला मिळण्याची जास्त शक्यता आहे. मिझोराम या ख्रिश्‍चन बहुल राज्यात भाजपची कसोटी आहे. तेलंगणामध्ये तर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. तिथं काँग्रेसच्या मदतीला चंद्राबाबू नायडू येतील, असं दिसतं.