Breaking News

कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना


।संगमनेर / प्रतिनिधी।

तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा फायदा होणेकामी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने संगमनेर बाजार समितीमध्ये सन २०१८-१९ या हंगामामध्ये शेतमाल तारण योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्याद्वारे वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये शेतमाल तारण ठेवून फक्त ६ टक्के व्याज दराने तूर, हरबरा, उडीद, मुग, सोयाबीन, भात, करडई, हळद, सुर्यफुल, गहु, बाजरी, मका, ज्वारी या शेतीमालासाठी शेतमाल तारण कर्ज मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील पिकांचा माल वखार महामंडळ, संगमनेर गोडावूनमध्ये ठेवून त्याची वखार पावती घेऊनच बाजार समितीकडे शेतमाल तारण कर्ज मुळ वखार पावतीसह विहीत नमुन्यात मागणी करावयाची आहे. सदर शेतीमालावर गहु, बाजरी, मका, ज्वारी यांना दैनंदिन बाजार भावाचे किंमतचे ५० टक्के कर्ज व उर्वरीत वरील पिकांसाठी चालु बाजार भावाचे किंमतीचे ७५ टक्के कर्ज शेतकऱ्यांना मिळण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये केली आहे. तारण कर्ज मिळण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये केली आहे, अशी माहिती संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व उपसभापती सतिष कानवडे व सचिव सतिष गुंजाळ यांनी दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.