मुख्यधिकार्‍यांची नियुक्ती करा अन्यथा अंदोलन-कास्ट्राईब!


माजलगाव (प्रतिनिधी)- येथील नगर परीषदेत गेल्या अनेक वर्षापासून मुख्याधीकारी हे पद रीक्त आसून,पर्यायी या ठिकाणी प्रभारी स्वरूपातीलच मुख्याधिकारी अतीरीक्त कार्यभार सांभाळतात,त्यातही . आता तर गेल्या अनेक माहिण्यापासून अतिरीक्तांकडेही कार्यभार नसल्यामुळ येथील पालीकेला कोणीच वाली आहे का नाही?हा प्रश्न कर्मचारी बांधवाबरोबरच शहरातील नागरीकांना सतावत, भेडसावत असून त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे जर पालीकेतील मा. मुख्याधीकारी यांचे पद भरले गेले नाही तर लोकशाही पद्धतीनं अंदोलन करण्याचा इशारा कास्ट्राइब संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल टाकणखार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे. या कार्यालयातील कर्मचारी बांधवाचे वेतन गेल्या अनेक महिण्यापासून रखरडल्यामुळे त्यांनी विविध बँका, पतसंस्था, सोसायटया, गृह, इत्यादीकडून घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवर व्याजाचा अधीक बोजा वाढत आहे, त्यामुळे तो कर्जबाजारी होऊन हवालदील झाला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी व आपल्या कुटूंबाच्या उपजीवीकेसाठी तो उसणवारीचा मार्ग पत्कारत असून कौटंबीक उदरनिर्वाह भागवत आहे.परंतू त्यातही आता या ठिकाणी अनेक महिण्यापासून कोणीही पदभार स्वीकारत नसल्यामुळे किंवा पद भरल्या जात नसल्यामुळे त्याला उसणवारी देणार्‍यांनी त्यांचे हात आखडलेले दिसत आहेत व त्याला उसणवारीसही कोणीही थारा देवू लागला नाही,पर्यायी त्याच्यासह त्याच्या कुटूंबाला उपासमारीला समोरं जावं लागत आहे,त्यामुळे तो नैराश्याच्यागर्दीत आडकत असून अनेक आजारानी ग्रस्त-त्रस्त झालेला दिसून येत आहे. तसेच,
नगरविकासाच्याही अनेक समस्या शहरात निर्माण होत आहेत, अनेक विकासात्मक योजनाची अमंलबजावणी ज्यात, रमाई आवास घरकूल, स्वच्छतागृहे, पाणी पुरवठा, विद्युतीकरण आदी योजना खडलेल्या, खोळंबलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत. शहरात अनेक आजारांचे थैमान वाढत आहे त्यावर निर्णयात्मक उपाययोजनेसाठी मा. मुख्याधीकारीच नाही. त्यामुळे अशा अनेक समस्या उत्पन्न झालेल्या असल्या कारणाने या ठिकाणचे मुख्याधीकारी पद हे तात्काळ भरून येथील कर्मचार्‍याबरोबरच दररोज उत्पन्न होत असलेल्या नागरी समस्यांची सोडवणूक करावी असे,प्रसिध्दी पत्रकान्वये कास्ट्राइबचे जिल्हा उपाध्यक्ष भारत टाकणखार जिल्हा कार्याध्यक्ष राहूल टाकणखार ता.अध्यक्ष वसंत टाकणखार ता.सचीव अभिमन्यू इबीते, राजकुमार सोनवणे, निलेश गावडे, किरन शिंदे, आनंद गायकवाड, नारायण भाळशंकर, अजीमोदीन खतीब, शिवाजी भाळशंकर, शेख आयुब, नागनाथ पडलवार, कृष्णा हौससरमल,सुभाष घणघाव, धोंडीराम रामुळे,बाबा जाधव, विश्वनाथ बेद्रे, जिवन डोंगरे, प्रतीक स्वामी, मनोहर कटारे, आसदसर, बळीराम घणघाव,पांढरपोटे, गोविंद पवार, अमीत वाघमारे,शेख मतीन, गावीतसर,किरण माने अमोल टाकणखार, नितीनपुटवाड, संग्राम जावळे आदींनी दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget