Breaking News

नवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक सप्तशती पाठ


कोपरगाव श. प्रतिनिधी :

शहरातील कलश मंगल कार्यालयात ‘नवरात्र उत्सव- जागर स्त्री शक्तीचा जागर अंबेचा’ या उपक्रमांत आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक दुर्गा सप्तशतीचा पाठ घेण्यात आला. यावेळी वृंदा को-हाळकर व त्यांच्या सहका-यांनी अंबेच्या अष्टरूपांचे सादरीकरण करून दुर्गाशक्तीचा जागर व आशिर्वाद जोगवा हा बहारदार कार्यक्रम सादर केला. रात्री रासदांडिया व गरबा पार पडला. कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कोपरगांव नगरपालिकेच्या सर्व नगरसेविका, महिला भाजपा तसेच युवा मोर्चा पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी युवती मोठया संख्येने उपस्थित होत्या.