Breaking News

शिवसेनेची सातारा-कोरेगाव मार्गावर मुरूम टाकून गांधीगिरी


सातारा (प्रतिनिधी) : सातारा शिवसेनेतफ सातारा शहर व माहुली शाखा यांचेतर्फे आज कोरेगाव रस्ता बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगम माहुली रस्त्यावरील ख़ड्डे स्वखर्चाने श्रमदान करून जवळजवळ 135 खड्डे मुरूम टाकून मुजवण्यात आले. गेले महीनाभर पाऊस थांबला असून देखील व वारंवार पी डब्यूडी बांधकाम विभागास निवेदन देऊन तोंडी सूचना करून देखील आजपर्यंत रस्त्यात पडलेले ख़ड्डे मुजवणेत आलेले नाहीत. 

आज रोजी शिवसेनेतर्फे खड्डे मुजवून बांधकाम विभागांना कोरेगाव रस्त्यावरील ख़ड्डे मुजवणेसाठी 25 अक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा 25 तारखेला माहुली फाटा जेथे ख़ड्डे मुजवले त्याच ठीकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. ख़ड्डे मुजवून श्रमदान करताना जिल्हा उपप्रमुख हरीदासजी जगदाळे, शहर प्रमुख निमिश शहा सातारा, उपतालुका प्रमुख रमेश बोराटे, वाहतूक सेना तालुका प्रमुख सचिन जगताप, विभाग प्रमुख खेड़ निलेश चव्हाण, माहुली शाखा प्रमुख दादासाहेब सुपेकर, विजय जगदाळे, विकास जाधव, प्रतीक पवार, बंटी चव्हाण, सुधीर जगताप, जयवंत सुयवंशी, हणमंत आढाव, उपशहर प्रमुख मारूती वाघमारे, सयाजी शिंदे, अनिल काशिद, अनिल भांबळ, जीतेंद्र वाघंबरे, नंदू गायकवाड़, रवी पवार, सचिन पवार, किशोर धुमाळ, सोमनाथ भोसले बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांनी ख़ड्डे भरून श्रमदान केले. या रस्त्यावरील खड्डे खडी व डांबर टाकून मुजवण्यात यावेत, आशी मागणी करण्यात आली आहे.