Breaking News

भाजपच्या विरोधात राम-लक्ष्मण!


सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली; पण पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील अस्वच्छतेमुळ रामलीला करणार्‍या राम-लक्ष्मण’ यांना उलटीचा त्रास झाला. त्यानंतर रामलीलाच्या आयोजकांसह राम-लक्ष्मण यांनी स्टेजवरच आंदोलनाला सुरुवात केली. राम-लक्ष्मण यांच्या आंदोलनाची बातमी कळताच प्रशासकीय अधिकार्‍यांची धावपळ उडाली. त्यांनंतर संबंधित अधिकार्‍यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन स्वच्छतेचं अश्‍वासन देऊन प्रकरण शांत केलं. वाराणसी येथील धनेसका तलावावर शनिवारी रामलीलातील शूर्पणखा आख्यान होणार होतं. यासाठी राम आणि लक्ष्मण या ठिकाणी पोहचले. तेथील दुर्गंधीमुळं रामलीलामधील दोन्ही पात्रं राम आणि लक्ष्मण यांना उटल्याचा त्रास सुरू झाला. आयोजकांनी रामलीला बंद करत राम आणि लक्ष्मणाच्या साथीनं आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर रामलीला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला आणि आंदोलनात सहभागी झाले. हा सर्व प्रकार ज्यावेळी प्रशासकीय अधिकार्‍यांना समजला, त्या वेळी त्यांचा गोंधळ उडाला.
महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छ भारत अभियान हाती घेतलं. या अभियानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला; परंतु जाहिातबाजीच जास्त आणि उपलब्धी कमी असं चित्र पुढं आलं. कॅगनं नुकतेच या अभियानावर ताशेरे ओढले आहेत. गावं हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली; परंतु कॅगच्या तपासणीत ही गावं हागणदारीमुक्त झालेली नाहीत, हे स्पष्ट झालं. काही ठिकाणी सात गावं स्वच्छ झाल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात एकही गावं स्वच्छ नव्हतं. काही ठिकाणी एखादं गाव स्वच्छ झालं होतं, तर दावा अनेक गावांचा करण्यात आला होता. उघडयावर लघुशंका व शौचाला जाण्यापासून परावृत्त करण्यावर हजारो कोटी रुपये खर्च झाले. सामाजिक दायित्त्व निधीच्या करण्यात आलेल्या उपयोगाचाही हिशेब लागत नाही. कॅगच्या अशा ताशेर्‍यानंतर ही सरकारला जाग आलेली नाही. मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली; पण पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील अस्वच्छतेमुळ रामलीला करणार्‍या राम-लक्ष्मण’ यांना उलटीचा त्रास झाला. त्यानंतर रामलीलाच्या आयोजकांसह राम-लक्ष्मण यांनी स्टेजवरच आंदोलनाला सुरुवात केली. राम-लक्ष्मण यांच्या आंदोलनाची बातमी कळताच प्रशासकीय अधिकार्‍यांची धावपळ उडाली. त्यांनंतर संबंधित अधिकार्‍यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन स्वच्छतेचं अश्‍वासन देऊन प्रकरण शांत केलं.

वाराणसी येथील धनेसका तलावावर शनिवारी रामलीलातील शूर्पणखा आख्यान होणार होतं. यासाठी राम आणि लक्ष्मण या ठिकाणी पोहचले. तेथील दुर्गंधीमुळं रामलीलामधील दोन्ही पात्रं राम आणि लक्ष्मण यांना उटल्याचा त्रास सुरू झाला. आयोजकांनी रामलीला बंद करत राम आणि लक्ष्मणाच्या साथीनं आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर रामलीला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला आणि आंदोलनात सहभागी झाले. हा सर्व प्रकार ज्यावेळी प्रशासकीय अधिकार्‍यांना समजला, त्या वेळी त्यांचा गोंधळ उडाला. आयुक्त अजय कुमार सिंह आणि एसडीएम विनय कुमार सिंह आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले आणि रविवारी सर्व तलाव साफ करण्याचं आश्‍वासन दिलं. 1545 पासून धनसरा तलावावर रामलीला होत आली आहे. स्थानिक प्रशासन या पंरपरेला बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळंच आम्ही वारंवार सुचना करूनही तलावाची स्वच्छता झाली नाही आणि येथील आतिक्रमण हटवण्यात आलं नाही.’ अशी माहिती राजाराम पांडे यांनी दिली. उत्तर प्रदेशातील लोकानाटयाचा रामलीला हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. रामाचं संपूर्ण चरित्र या नाटयातून सादर केलं जातं. त्यासाठी आपल्या ठरलेल्या पात्राप्रमाणं विशेष अशी भडक रंगभूषा आणि वेशभूषा कलाकार धारण करतात. यातील रामाची भूमिका साकारणार्‍या कलाकाराला इतकं महत्त्व असतं, की त्याची सर्वप्रथम पूजा करून मिरवणूक काढली जाते. त्या वेळी जमलेले लोक त्याच्या पाय पडतात आणि नंतरच तो रामाचं पात्र सादर करण्यासाठी रंगमंचावर जातो. रामलीलामध्ये रामाची भूमिका राजाराम पांडे करतात. मिथिलेश त्रिपाठी लक्ष्मणाच्या भूमिकेत तर हनुमानाचं पात्र रामललीत पांडे भूषवितात. विभिषणाचं काम राम सखा पांडे जे या रामलीलाचे मालक आहेत ते स्वत: करतात. त्यांनाच आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली.
राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र भाजपाचे काही नेते पक्षाचे नाव खराब करण्याचं काम करत असल्याचं दिसत आहे. राजस्थान सरकारमधील मंत्री शंभू सिंह खातेसर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघुशंका करताना दिसत आहे. मागंही राजस्थानमध्ये असाच एका मंत्र्यांची उघड्यावरची लघुशंका चांगलीच गाजली होती. खातेसर लघुशंका करत असलेल्या भिंतीवरच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं पोस्टर लावण्यात आलं आहे. मंत्र्याचा लघुशंका करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजस्थानमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. मंत्री खातेसर यांनी उघड्याावर लघुशंका करण्याच्या कृतीचं समर्थन केलं आहे. उघड्यावर लघुशंका करणं ही जुनी परंपरा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. खातेसर यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पोस्टर खाली लघुशंका केल्याचा आरोप मात्र फेटाळून लावला. शंभू सिंह खातेसर यांचा लघुशंका करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा बचाव करताना मंत्री खातेसर म्हणाले, की उघड्यार शौच करणे आणि लघुशंका करणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खातेसर यांनी ज्या ठिकाणी लघुशंका केली त्याठिकाणी भाजपची निवडणूक रॅली सुरू होती. लाखो लोक रॅलीमध्ये उपस्थित होते, तरीही खातेसर यांना लघुशंका करणं गैर वाटलं नाही. खातेसर म्हणाले, की, त्या ठिकाणी दूरपर्यंत कोठेही शौचालय नव्हतं आणि सकाळपासून कामात व्यस्त होतो. त्यामुळं मला उघड्यावर लघुशंका करावी लागली. ज्या ठिकाणी लोकांचं वास्तव्य नाही अशा ठिकाणी लघुशंका केल्यानं रोगराई पसरत नाही, असं त्यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं. मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. मात्र, त्यांच्याच पक्षातील लोक या मोहिमेला तडा लावत असताना दिसत आहेत. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. काँग्रेस पक्षानंही सोशल मीडियावर हा मुद्दा उचलून धरला आहे.