Breaking News

सेवानिवृत्त जवानाचा केळघर येथे सत्कार


केळघर (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील केळघर येथील भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाने जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्याला एक वेगळा आदर्श घालून दिला असून या गावचा सेवानिवृत्त जवान यशवंत बेलोशे गेले 23 वर्षे देशसेवा करुन आपल्या जन्मभुमित परतल्यावर त्यांचा सहकुटुंब सत्कार करून या मंडळाने एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांनी केले.

केळघर येथील जवान यशवंत बेलोशे हे 23 वर्षे देशसेवा करुन सेवानिवृत्त होऊन आपल्या केळघर या जन्मभुमीत परतल्यावर भैरवनाथ गणेश मंडळ, ओम साई मित्र मंडळ. ग्रामस्थ केळघर यांच्या वतीने आयोजीत केलेल्या भव्य सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. अर्चनाताई रांजणे, सभापती बापुराव पार्टे, सपोनि जीवन माने, प्राथमिक शिक्षक बॅकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, पंचायत समिती सदस्य विजयराव सुतार, ज्ञानदेव रांजणे, सरपंच रविंद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, दत्तात्रय पार्टे, मोहनराव कासुर्डे, मच्छिंद्र क्षिरसागर, एकनाथ पवार, उद्योजक राजेंद्र धनावडे, साचिनशेठ पार्टे, शंकर जांभळे, सुनिल देशमुख, सागर धनावडे, सुनिल जांभळे, बबनराव बेलोशे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रारंभी जवान यशवंत बेलोशे यांचे आपल्या जन्मभुमित भव्य दिव्य मिरवणुकीने केळघर गावच्या वेशीपासून बाजारपेठ व गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तसेच परिसरातील 12 जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक राजेंद्र धनावडे, सचिनशेठ पार्टे, शंकर जांभळे, दिपक मोरे, सुनिल जांभळे, बाजीराव धनावडे, जगन्नाथ पार्टे, प्रितम पार्टे, सतिश पार्टे, अनिल बेलोशे, अमोल बेलोशे, संजय पार्टे, संदिप बेलोशे, सुनिल बेलोशे, राजेश शिर्के यांच्यासह भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, ओम साई मित्र मंडळ केळघर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.