Breaking News

आदित्य पाटील यांचा वाढदिवस शालेय साहित्य व फळवाटप करून साजरा


बीड (प्रतिनिधी)ः- खा.रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांचे चिरंजीव, माऊली विदयापीठ केज चे सचिव, केज नगरीचे नगराध्यक्ष व युवक प्रदेश युवक कॉग्रेसचे सरचिटणीस मा.आदित्य (दादा) पाटील यांचा वाढदिवस माऊली प्राथमिक विदयालय बीडयेथे शालेय साहित्य व फळवाटप करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन विदयापिठ चे संचालक नवनाथ थोटे बापु व पालक भागवत मस्के हे उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माने संतोष भगवानराव हे उपस्थित होते. नवनाथ थोटे बापु यांनी आदित्यदांदाना उदंड आयुष्य लाभावे व त्यांची राजकीय कारकीर्द भरभराटीचे जावो अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माने सर यांनी आदित्यदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डोळस आर.पी.यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेचे सहशिक्षक श्रीमती आवाड, थिटे, गायकवाड, पवार, श्री.लोंढे सर व विदयार्थी उपस्थित होते.