कांदा आणि डाळींब मार्केट सुरू करा : मनसे

नेवासा प्रतिनिधी

नेवासा व कुकाणा येथे कांदा व डाळींब मार्केट सुरू करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा देण्यात आला. याबाबत माजी आ. शंकरराव गडाख व नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना तालुका मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्याचे ठिकाण असूनदेखील येथे कांदा मार्केट नाही. नदीकाठच्या गावापासून ते घोडेगावपर्यंत शेतकऱ्यांना कांदे वाहतूक भाडे दयायला परवडत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेवासा शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देशमुख, शहर अध्यक्ष संतोष गव्हाणे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अर्चना गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्षा रजनी पडूंरे उपाध्यक्ष दीपक परदेशी, विभाग अध्यक्ष रविंद्र पिंपळे आदींच्या सहया आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget